'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील क्यूट टप्पू आता विलनच्या भूमिकेत, भव्य गांधी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला
Bhavya Gandhi Turns Villain : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील क्यूट टप्पू आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bhavya Gandhi in Pushpa Impossible : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून अनेक कलाकारांना स्टारडम मिळाला. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील निरागस आणि तितकाच मस्तीखोर टप्पू या भूमिकेतून भव्य गांधी याला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे भव्य गांधींचं नाव घराघरात पोहोचलं. प्रेक्षकांनी या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना भरपूर प्रेम दिलं. भव्य गांधीने काही काळापूर्वी ही मालिका सोडली होती. आता भव्य गांधीच्या अभिनयातील कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतूल क्यूट टप्पू म्हणजेच भव्य गांधी आता खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील टप्पू आता विलनच्या भूमिकेत
आता सोनी सबवरील लोकप्रिय शो 'पुष्पा इम्पॉसिबल' मालिकेत भव्य गांधीची (Bhavya Gandhi) एन्ट्री होणार आहे. पुष्पाच्या (करुणा पांडे) प्रेरणादायी प्रवासात भव्य गांधी अडचण निर्माण करताना दिसणार आहे. भव्य गांधींच्या एंट्रीने पुष्पा आणि तिच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात एक नवीन संकट निर्माण होणार आहे. भव्य गांधी 'पुष्पा इम्पॉसिबल' मालिकेमध्ये मानसिकदृष्ट्या आजारी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. शोमधील त्याच्या पात्राचे नाव 'प्रभास' आहे. तो सूडाच्या भावनेने पुष्पाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
भव्य गांधी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला
View this post on Instagram
पूर्णपणे वेगळी आहे नवीन व्यक्तिरेखा
'पुष्पा इम्पॉसिबल' मालिकेमधील भव्य गांधीची 'प्रभास'ची भूमिका खरोखरच आव्हानात्मक भूमिका आहे. भव्य गांधीची ही भूमिका त्याच्या टप्पूच्या निरागस भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. प्रभासची मानसिकता आणि त्यातून निर्माण झालेला तणाव या कथेमध्ये नवा ट्विस्ट आणताना दिसणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे. प्रभासची भूमिका साकारणं, त्याच्यासाठी नवीन आणि रोमांचक आव्हान असल्याचं भव्य गांधीनं म्हटलं आहे. या भूमिकेतून भव्य गांधीचं अभिनय कौशल्य आणि त्यातील वैविध्य दिसण्यास मदत होईल.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :