Pushkar Shrotri: 'कॉलेजमध्ये असताना मी रिक्षा चालवायचो'; पुष्कर क्षोत्रीनं सांगितल्या होत्या आठवणी
पुष्कर (Pushkar Shrotri) हा विविध मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील किस्से सांगत असतो.
Pushkar Shrotri: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता पुष्कर क्षोत्री (Pushkar Shrotri) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पुष्कर हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. पुष्कर हा विविध मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील किस्से सांगत असतो. एका मुलाखतीमध्ये पुष्करनं त्याच्या कॉलेजमधील आठवणी सांगितल्या होत्या. जाणून घेऊयात पुष्करच्या कॉलेजमधील आठवणी...
पुष्करनं सांगितली कॉलेजमधील आठवण
पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) आणि प्रसाद ओक यांनी जितेंद्र जोशीच्या दोन स्पेशल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी पुष्करनं त्याच्या कॉलेजमधील आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, 'मी कॉलजमध्ये असताना रिक्षा चालवत होतो. स्वत:चे पैसे स्वत: कमवावेत असं मला वाटत होतं. आई-वडिलांकडे पैसे मागायचे नाहीत, असं मी ठरवलं होतं. एकदा मी रिक्षा चालवत असताना, माझे आजोबा रिक्षामध्ये बसले. मी त्यांना म्हणालो, तुमच्याकडून पैसे घेणार नाही.' पुष्करच्या या बोलण्यावर प्रसाद ओक म्हणाला, आताही तो किश्यांची रिक्षाच लावतो.'
एका मुलाखतीमध्ये पुष्करनं सांगितलं होतं, 'कॉलेजमध्ये मी भिंतीवर जाहिराती रंगवायचो. मी क्रिटिंग कार्ड्स बनवून लोकांना विकत होतो.'
पुष्कर हा सध्या अ परफेक्ट मर्डर या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुष्करनं हिप हिप हुर्रे,झकास,बदाम राणी गुलाम चोर,ब्लफमास्टर या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यानं सून सासू सून, हम तो तेरे आशिक है या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. बिल्लू, मुन्ना भाई M.B.B.S., या हिंदी चित्रपटांमधील भूमिका देखील पुष्करनं साकारल्या आहेत.
View this post on Instagram
पुष्कर हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पुष्करनं अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलं आहे.
View this post on Instagram
पुष्कर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. पुष्करला इन्स्टाग्रामवर 20K फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: