Video : पुलकित सम्राट आणि कृती खरबंदाचा लग्नात जबरा डान्स; सोशल मीडियात एकच चर्चा!
Pulkit Samrat Kriti Kharbannda Dance : पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांनी लग्नात धमाकेदार डान्स केला आहे. जोडप्याचा लग्नात डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pulkit Samrat Kriti Kharbannda Dance Video : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. अखेर 16 मार्च 2024 रोजी ते लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील जोडप्याचा लग्नात डान्स करतानाचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पुलकित आणि कृतीने लग्नसोहळ्याचे फोटो (Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding Photo) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्स करत जोडप्याला अभिनंदनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच आता पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांचा जबरा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. लग्नानंतर पुलकित आणि कृती घरी पोहोचले आणि त्यांनी धमाकेदार डान्स केला.
पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल (Pulkit Samrat Kriti Kharbanda Dance Video)
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शनिवारी रात्री पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पुलकित आणि कृती ढोलवर डान्स करताना दिसत आहे. पुलकित आणि कृतीच्या आसपास त्यांचे मित्रमंडळीदेखील दिसत आहेत.
पुलकित-कृतीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
पुलकित आणि कृतीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक नंबर जोडी, अमेजिंग जोडी, जोडप्याचा लूक खूपच कमाल आहे, वाह, दोघांनाही खूप-खूप शुभेच्छा, मनसोक्त डान्स करा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
पुलकित सम्राट दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका सिनेमाच्या सेटवर झाली आहे. पुलकित आणि कृती अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. कृतीआधी पुलकित 2014 मध्ये श्वेता रोहिरासोबत लग्नबंधनात अडकला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2015 मध्ये पुलकित आणि रोहिरा यांचा घटस्फोट झाला.
संबंधित बातम्या