(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राला लखनौत विरोध; विरोधकांनी लावले पोस्टर
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे.
Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या भारतातील प्रवासादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मुंबईनंतर आता प्रियांका लखनौमध्ये आहे. पण लखनौमध्ये तिला विरोध होत असल्याचं दिसत आहे.
मुलींवरील हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रियांका चोप्रा दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहे. दरम्यान गोमतीनगर येथील संतमूलक चौकाजवळ अभिनेत्रीच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. 'यू आर नॉट वेलकम सिटी ऑफ नवाब' असं या पोस्टवर लिहिण्यात आलं होतं. पण हे पोस्टर नक्की कोणी लावलं हे अद्याप समोर आलेले नाही.
पोस्टरमुळे प्रियांका लखनौला आल्याने काही लोक खूश नसल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रियांकाने प्राथमिक शाळेतील उपक्रमात सहभागी होऊन मीना मंचासोबत अंगणवाडी केंद्रात होणाऱ्या उपक्रमांचे निरीक्षण केले आहे. आता ती गोमतीनगर परिसरातील युनिसेफ कार्यालयासह न्यू बॉर्न केअर युनिट आणि महिला रुग्णालयात हजेरी लावणार आहे.
View this post on Instagram
प्रियांका तिच्या हेअर केअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आलेली आहे. भारतातील आठवणी कायम सोबत राहाव्यात यासाठी ती सेल्फी आणि व्हिडीओ काढत आहे. आपला देश सोडून पुन्हा दुसऱ्या देशात जायचं म्हटल्यावर प्रियांका भावूक झाल्याचं दिसून आलं.
प्रियांका चोप्राचे आगामी सिनेमे
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. प्रियांकाचे दोन हॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. यात 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्स' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच 'जी ले जरा' हा बॉलिवूड सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
संबंधित बातम्या