Priya Bapat: 'मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं?'; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नुकतीच प्रियानं (Priya Bapat) वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रियाचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक नेटकरी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. प्रिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच प्रियानं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रियानं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टला तिनं कॅप्शन दिलं,'प्रिय बाबा, आज तुमचा 81 वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे.
पुढे पोस्टमध्ये प्रियानं लिहिलं, 'प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे "माझे बाबा". अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A Economics केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा.'
या पोस्टमध्ये प्रियानं लग्नानंतर आडनाव न बदलण्याचं कारण सांगितलं, 'मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला "प्रिया" म्हटलत आणि "प्रिया शरद बापट" ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.'
View this post on Instagram
प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे.