(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ae Watan Mere Watan: सारा अली खान साकारणार महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका; पाहा 'ऐ वतन मेरे वतन' मधील लूक
'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या चित्रपटाची घोषणा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मनं केली आहे. या चित्रपटात सारा अली खान एका महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे.
Sara Ali Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या चित्रपटातील साराचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात सारा अली खान एका महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाची घोषणा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मनं केली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडीओमधील साराच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा एका खोलीमध्ये जाते. त्यानंतर ती त्या खोलीचे दार आणि खिडक्या बंद करते. त्यानंतर सारा म्हणते, 'अंग्रेजों को लग रहा है कि उन्होंने क्विट इंडिया का सिर कुचल दिया है. लेकिन आझाद आवाजें कैद नहीं होती. ये है हिंदुस्तान की आवाज है, हिंदुस्तान में कहीं से, कहीं पे हिंदुस्तान में.' साराच्या या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची पटकथा दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केलं आहे.
पाहा साराचा लूक
View this post on Instagram
सारा अली खान, रिचर्ड भक्ती क्लेन आणि अॅलेक्स ओनेल यांनी 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटातील साराच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून घोषित करण्यात आलेली नाही.
साराचे चित्रपट
'ऐ वतन मेरे वतन' तसेच 'गॅसलाइट' हे साराचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल, सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: