एक्स्प्लोर

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; अभिनेत्रीने सुरू केला स्वत:चा व्यवसाय

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नवा व्यवसाय सुरू केला आहे.

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता अभिनेत्रीने नवी इनिंग सुरू केली आहे. प्रार्थनाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

प्रार्थना बेहेरेचा नवा व्यवसाय (Prarthana Behere New Business)

प्रार्थनाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. 'वी नारी' असे या ब्रँडचे नाव आहे. इंस्टा लाईव्ह येत अभिनेत्रीने चाहत्यांना या ब्रँडची माहिती दिली आहे. प्रार्थनाने लिहिलं आहे,"स्वत:चा ब्रँड सुरू करण्याची माझी खूप इच्छा होती. गेल्या काही दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होते. आता मी आणि माझ्या नणंदेने मिळून आम्ही एक ब्रँड सुरू केला आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थना पुढे म्हणाली,"वी नारी' असं या ब्रँडचं नाव आहे. हा साड्यांचा ब्रँड आहे. आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे नऊ दिवसांसाठी नऊ रंगाच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील. या साड्या कशा खरेदी करायच्या यासंदर्भात लवकरच माहिती देईल. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी माझ्या नव्या व्यवसायाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच सोबत राहुद्या". प्रार्थनाने साडीची झलकही चाहत्यांसोहत शेअर केली आहे.

प्रार्थना बेहेरेबद्दल जाणून घ्या... (Who is Prarthana Behere)

प्रार्थना बेहेरे लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हिंदी मराठी सिनेमांत आणि मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. पहिल्याच मालिकेने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. प्रार्थनाची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 

प्रार्थनाने 2009 मध्ये 'रीटा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जय महाराष्ट्र ढाबा भटिंगा, वक्रतुंड महाकाय, मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुगे अशा अनेक सिनेमांचा प्रार्थना भाग आहे. प्रार्थना वर्षाला 10 ते 15 कोटींची कमाई करते. प्रार्थना लवकरच एका चांगल्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

संबंधित बातम्या

Prarthana Behere : गणपती बाप्पा मोरया म्हणत आईच्या हातावर लाटणं मारलं अन्...; प्रार्थनासाठी बाप्पा कसा ठरला विघ्नहर्ता?

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget