(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्राझीलमधील लोकप्रिय गायिका Marilia Mendonca चा विमान अपघातात मृत्यू, वयाच्या 26 व्या वर्षी गमावला जीव
Marilia Mendonca: ब्राझीलमधील गायिका मॅरिलिया मेंडॉन्सा हिचा शुक्रवारी झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला आहे. 2019 सालामध्ये तिने लॅटिन ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.
Brazilian singer Marilia Mendonca dies in plane crash : ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांमधील एक नाव म्हणजे मॅरिलिया मेंडॉन्सा (Marilia Mendonca). मॅरिलिया मेंडॉन्साचे शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात वयाच्या 26 व्या वर्षी दुर्देवी निधन झाले आहे. मॅरिलिया मेंडॉन्सासह विमान दुर्घटनेत तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला. निर्माते हेन्रिक रिबेरो, सहाय्यक अबिसिएली सिल्वेरा डायस फिल्हो तसंच विमानाचा पायलट आणि सहवैमानिक दोघांचाही अपघातात मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या अपघाताच्या कारणाचा तपास सुरु आहे. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते वीज वितरण लाईनला धडकल्याची माहिती समोर आली आहे. मॅरिलिया मेंडॉन्साने 2019 सालामध्ये लॅटिन ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं होतं. महिलांच्या प्रश्नांवर वाचा फोडताना, महिला संबंधित विषयांवर भाष्य करताना अनेकदा मॅरिलिया दिसून येते.
2016 सालची नॅशनल स्टार
ब्राझीलमधील संगीतकार, गायकांमधील एक महत्तवपूर्ण नाव म्हणजे मॅरिलिया मेंडॉन्सा. मॅरिलिया मेंडॉन्साने कमी वयात संगीत क्षेत्रात खूपच लांबचा पल्ला गाठला होता. देशभर तिने प्रचंड नाव कमावले होते. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संगीत कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यावेळेसदेखील तिने ऑनलाइन कार्यक्रमांतून संगीताचा प्रवास सुरू ठेवला होता.
Satyamev Jayate 2 Song: 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील 'तेनु लगंगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, जॉन आणि दिव्या थिरकणार
मॅरिलियालाआहे दोन वर्षाचा मुलगा
मॅरिलिया मेंडॉन्साला दोन वर्षाचा मुलगादेखील आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय लाइव्ह स्ट्रीममध्येदेखील तिने रेकॉर्ड केले होते. अपघाताच्या काही तासांपूर्वीच मॅरिलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाची तयारी करताना ती दिसून येत आहे. दरम्यान विमानात नास्टा करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या चार तासांनी तिच्या टीमने मॅरिलियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे.