एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Poonam Pandey : "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ

Poonam Pandey Death News : लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील (Cervical cancer) एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Poonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) जिवंत आहे. तिच्या (Poonam Pandey Death News) निधनाची बातमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील (Cervical cancer) एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पूनम पांडेने शेअर केला व्हिडीओ (Poonam Pandey Shared Video)

पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे - मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत".

View this post on Instagram
 
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पूनमने पुढे लिहिलं आहे,"इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया".

पूनमच्या 'त्या' पोस्टनंतर निधनाच्या उलट-सुलट चर्चांना सुरुवात

पूनम पांडेने 2 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कॅन्सशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
Poonam Pandey :

पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. तसेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त 
(World Cancer Day) तिने ही पोस्ट केली असेल, असाही अंदाज बांधला जात होता. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निधनाची बातमी येण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत पूनम शूटिंग करत होती.

कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)

पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये 'नशा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक सिनेमांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Poonam Pandey Death News : मोठी बातमी: मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget