एक्स्प्लोर

Pooja Sawant Engaged : पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो समोर

Pooja Sawant Engagement Photo : कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 

पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण आता अभिनेत्रीचा सारखपुडा (Pooja Sawant Engaged) संपन्न झाला असून या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पूजाच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. एकीकडे चाहते तिचं अभिनंदन करत असले तरी दुसरीकडे मात्र काही चाहत्यांचा हर्टब्रेक झाला आहे. पूजाने साखरपुड्यादरम्यान हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, हार असा लूक केला होता. तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. 

पूजा सावंत कोण आहे? (Who is Pooja Sawant)

पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

पूजा सावंतचा होणार पती कोण? (Who is Pooja Sawant Husband)

पूजा सावंतने जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. रिपोर्टनुसार, पूजा सावंतचा होणारा पती 
ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे.  

पूजा सावंत कधी लग्न करणार? (Pooja Sawant on Wedding)

लग्नाच्या मुहूर्ताबद्दल एबीपी माझासोबत काही दिवसांपूर्वी बोलताना (Pooja Sawant on Marriage)  पूजा सावंत म्हणालेली,"चव्हाण आणि सावंत हे दोन्ही कुटुंबिय मिळून लग्नाबाबत निर्णय घेतील. सध्या दोन्ही कुटुबियांमध्ये लग्नाबाबत बोलणी सुरू आहे. सिद्धेशला त्याच्या कामातून आणि मला माझ्या प्रोजेक्टमधून वेळ मिळेल त्यावेळी लगेचच आम्ही लग्न करू. उखाणे घेण्यास आता मी सज्ज आहे".

संबंधित बातम्या

Pooja Sawant on Marriage : सिद्धेशला साथीदार म्हणून का निवडलं, लग्नाचा मुहूर्त कधी? पूजा सावंत Exclusive

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget