![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prasad Oak : लोकशाहीर 'पठ्ठे बापूराव' यांचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर येणार; अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिकेत
Patthe Bapurao : 'पठ्ठे बापूराव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Prasad Oak : लोकशाहीर 'पठ्ठे बापूराव' यांचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर येणार; अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिकेत Patthe Bapurao New Upcoming Marathi Movie Poster Out Prasad Oak Amruta Khanvilkar Lead Role Film Artist Shared Post On Social Media know details Entertainment Updates Prasad Oak : लोकशाहीर 'पठ्ठे बापूराव' यांचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर येणार; अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/3f0a4be2eda423b6c1694e18246cde101697345621627254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Patthe Bapurao Marathi Movie : लोकशाहीर पठ्ठे बापूराव (Patthe Bapurao) यांचं जीवनचरित्र आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर 'पठ्ठे बापूराव' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. या सिनेमात प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील प्रसाद ओकनेच सांभाळली आहे.
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने 'कच्चा लिंबू', 'हिरकणी', 'चंद्रमुखी' अशा सिनेमांमधून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या सिनेमात त्याच्यासह अमृता खानविलकर पवळाच्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आले.
View this post on Instagram
प्रसाद ओकने शेअर केलं 'पठ्ठे बापूराव'चं पोस्टर
'पठ्ठे बापूराव' या सिनेमाचं पोस्टर प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती...आशीर्वाद असूद्या मायबापहो...नवनव्या कवनांचा रोज नवा डाव,लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव कलारत्न 'पठ्ठे बापूराव". प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत नव्या प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.
पठ्ठे बापूरावांचा जीवनसंघर्ष...
श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत "पठ्ठे बापूराव" या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.
आबा गायकवाड यांनी 'पठ्ठे बापूराव' या सिनेमाचं लेखन केलं आहे. स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
संबंधित बातम्या
Shahir Patthe Bapurao: प्रतिभाशाली तमाशा कलावंत शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)