(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महेश भट यांच्यामागे निर्वस्त्र पळाली होती परवीन बाबी, पावसात भिजत सोडून गेला दिग्दर्शक; 'ही' अधुरी प्रेम कहाणी माहितीय?
Parveen Bobby Mahesh Bhatt Dating : दिग्दर्शक महेश भट यांचं अभिनेत्री परवीन बाबीवर प्रेम जडलं होतं, तिच्यासाठी ते पत्नी आणि दोन मुलांना सोडायलाही तयार झाले होते. ही प्रेमकहाणी जाणून घ्या.
Actress Parveen Bobby Unknown Facts : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत होती. महेश भट यांचं वैयक्तिक आयुष्यही चित्रपटांसारखंच ग्लॅमरस होतं. त्यांच्या आयुष्यातही रोमान्सची कोणतीही कमी नव्हती. त्यांचं बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबीसोबतही रिलेशनशिप होतं. या दोघांची प्रेमकहाणी फारच कमी लोकांना माहित आहे.
महेश भट आणि परवीन बाबीची प्रेमकहाणी
महेश भट यांनी लॉरेनसोबत लग्न केलं होतं, तिचं नाव नंतर किरण भट ठेवण्यात आलं. पण, लग्न झालेलं असतानाही ते अभिनेत्री परवीन बाबीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. परवीन बाबीने 70 आणि 80 च्या दशकातील काळ गाजवला, तिचे लाखो चाहते होते. बोल्ड आणि सौंदर्यवान अभिनेत्री परवीन बाबीने चाहत्यांना वेड लावलं होतं. पण, ही अभिनेत्रीचं मात्र महेश भट यांच्यावर फिदा झालं. परवीन बाबीचं हदय महेश भट यांच्यासाठी धडकत होतं. परवीन बाबीसोबत महेश भट एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच काय तर परवीन बाबीसाठी महेश भट यांनी बायको मुलांना सोडून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
'ही' अधुरी प्रेम कहाणी माहितीय?
परवीन बाबीचं वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं, पण तिचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. महेश भट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबी आणि त्यांच्या प्रेमकहाणीबाबत खुलासा केला होता. ईटाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा परवीब बाबी निर्वस्त्र स्थितीत भरपावसात त्यांच्या मागे पळाली होती.
महेश भट यांच्यामागे निर्वस्त्र पळाली होती परवीन बाबी
महेश भट यांनी सांगितलं होतं की, परवीन आणि मी बेडरुमध्ये होतो. परवीन मला म्हणाली की, "महेश मी किंवा यूजी? हे ऐकून मला धक्का बसला. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. मी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, पण ती समजून केली आणि तिच्या डोळ्यातूव घळाघळा अश्रू वाहू लागले. यानंतर मी कपडे घातले. ती म्हणाली, एसी कमी कर खूप थंडी वाजतेय. रुममध्ये शांतता होती आणि बाहेर पाऊस सुरु होता. मी गुपचूप रुममधून बाहेर पडलो. ती माझ्या मागे आवाज देत बाहेर आली. पण, मी मागे वळून पाहिलं नाही. मी लिफ्टची वाट पाहतही थांबलो नाही आणि पायऱ्यांनी खाली उतरू लागलो. ती माझ्या मागे पळत असल्याचं मी ऐकलं. मला मागे वळून तिला सांगायचं होतं की, तू अशा स्थितीत (निर्वस्त्र) बाहेर येऊ नको, पण मी काही न विचार करता तसाच पुढे निघून गेलो".
परवीन बाबीसाठी बायको-मुलांना सोडायला तयार होते महेश भट
परबीन बाबीने उल्लेख केलेली व्यक्ती यूजी म्हणजे कुणी तरुणी नाही, तर त्यांचे मित्र, मार्गदर्शक यू.जी. कृष्णमूर्ती होते. यूजी यांनी महेश भट यांना परवीन बाबीसोबतचं नातं तोडण्यास सांगत पत्नी आणि मुलांसोबत राहून सुखी संसार करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा महेश भट परवीन बाबीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि तिच्यासाठी पत्नी किरणसह मुलही पुजा भट आणि मुलगा राहुल भट यांनाही सोडण्यास तयार होते.
सोनी राजदानसोबत दुसरं लग्न
महेश भट यांनी सोनी राजदान यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. या लग्नातही खूप अडचणी आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण, सोनी राजदान यांच्यासोबत लग्न झाल्यावर त्यांचं जीवन सुरळीत झालं. सोनी राजदानसोबत लग्न करण्यासाठी महेश भट यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांच्या लग्नाला 38 वर्ष झाली असून त्यांना अभिनेत्री आलिया भट आणि शाहीन भट या दोन मुली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :