(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parineeti Chopra: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; परिणीती अशी झाली बॉलिवूड स्टार
परिणीतीचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला.
Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. परिणीतीच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात. परिणीतीचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. परिणीतीचे वडील व्यापारी असून तिची आई गृहिणी आहे. परिणीतीचे सुरुवातीचे शिक्षण अंबाला येथे झाले. परिणीती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला वयाच्या 17 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले.
अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार स्वप्नातही केला नव्हता
अभ्यासात हुशार असलेली परिणीती इंग्लंडला शिक्षणासाठी गेली. तिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. परिणीतीने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स केले. परिणीतीचे स्वप्न इन्व्हेस्टमेंट बँकर होण्याचे होते. पण 2009 मध्ये आलेल्या मंदीमुळे तिला भारतात परत यावे लागले आणि ती मुंबईत आली. मुंबईत तिनं यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग विभागात काम करण्यास सुरुवात केली.
परिणीती यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग विभागात काम करत असताना ती बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. परिणीती अभिनयात आणखी चांगली कामगिरी करू शकते, असे आदित्य चोप्राला वाटत होते. त्याने परिणीतीला तीन चित्रपटांसाठी बाँड साइन करून घेतला.
View this post on Instagram
इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात परिणीतीसोबतच हार्डी संधू, शरद केळकर, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: