एक्स्प्लोर
मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल
दिग्गज अभिनेते परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रपटाची निर्मिती करत असून मोदींची भूमिका आपल्यापेक्षा उत्तम पद्धतीने कोणीच साकारु शकत नाही, असा दावा रावल यांनी केला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोणीच माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने वठवू शकत नाही, असा पुनरुच्चार दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी केला. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या 'नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर रावल यांनी हा दावा केला. परेश रावलही नरेंद्र मोदींवर चित्रपटाची निर्मिती करत असून गेल्याच वर्षी त्यांनी याबाबत घोषणा केली होती.
'आपण दर सोमवारी भात खाणं टाळुया, असं मी नऊ वर्षांचा असताना माझी आई म्हणाली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला सैन्यासाठी धान्य देण्याचं आवाहन केलं होतं. एका प्रामाणिक माणसाच्या आवाहनामुळे अनेकांनी ही मागणी उचलून धरली होती. त्याचप्रमाणे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरगुती गॅसचं अनुदान गरजूंसाठी सोडण्याचं आवाहन केलं, तेव्हा जनतेने ही मागणी ऐकली, कारण एका प्रामाणिक व्यक्तीचं हे आवाहन होतं' असं सांगत परेश रावल यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.
'फारसा अनुभव नसतानाही त्यांनी आधी एक राज्य आणि नंतर एका देशाची धुरा कशी सांभाळली, हे आपल्या चित्रपटातून दाखवणार आहे' असंही परेश रावल यांनी सांगितलं. 'ते फक्त पंतप्रधान नाहीत, तर गावोगावी फिरुन समस्यांचा अभ्यास करणारे देशवासी आहेत. यामुळे आम्हाला त्यांच्यावर बायोपिक करावासा वाटला' असं परेश रावल म्हणाले.
'मी मोदींना पंतप्रधान कार्यालयात भेटलो होतो. त्यांना भेटून मी अत्यंत प्रभावित झालो. मोदींची राजकीय जाण आणि शेजारी देशांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. अमेरिकन्सही त्यांच्याकडून सल्ला घेतात' असं रावल यांनी सांगितलं.
'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचं पोस्टर 23 भाषांमध्ये लाँच करण्यात आलं. अभिनेता विवेक ओबेरॉय चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे, तर ओमंग कुमार यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. चित्रपटातून मोदी यांचा भाऊ, पुत्र, सेवक अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी सर्वात कठीण काम आहे. मी चित्रटपटाबद्दल उत्सुक असल्याचं विवेक ओबेरॉय म्हणाला. तर नरेंद्र मोदींची भूमिका साकारायला मिळणं हे विवेकचं भाग्य आहे, अशा भावना विवेकचे वडील - ज्येष्ठ अभिनेते आणि नरेंद्र मोदी चित्रपटाचे निर्माते सुरेश ओबेरॉय यांनी व्यक्त केली.
चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारीच्या मध्यावधीत सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकांच्या आधी हा सिनेमा रिलीज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सिनेमात आणखी कोणकोणत्या व्यक्तिरेखा असणार, त्या भूमिका कोण साकारणार, मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement