Pandu : आला रे आला पांडू छोट्या पडद्यावर आला, 30 जानेवारीला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
Pandu : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 30 जानेवारीला पांडूचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
Pandu : बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूने आणि केळेवाल्या उषाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पांडू चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'पांडू' सिनेमाचा आता 30 जानेवारीला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'पांडू' सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तर चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. पांडू सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रविण तरडेंसह प्राजक्ता माळीदेखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
अवघ्या 24 तासात सिनेमातील बुरुम बुरुम गाण्याने 20 लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या 24 तासात 10 लाख व्ह्यूज मिळवले होते. अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके व सोनाली कुलकर्णी यांचा पांडू हा सिनेमा तुफान गाजत आहे. या सिनेमातील भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
संबंधित बातम्या
15 वर्षांपासून नशीब आजमावणाऱ्या रसिका दुग्गलला OTT वर लॉटरी; जाणून घ्या मिर्झापूरच्या बिना त्रिपाठीबद्दल
Pushpa : 'पुष्पा'च्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले अल्लू अर्जुनचे व्यंगचित्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha