Panchayat 3 Cast Fees : जितेंद्र कुमार, नीना गुप्ता ते रघुबीर यादव; जाणून घ्या 'पंचायत 3'मधील कलाकारांच्या मानधनाबद्दल...
Panchayat 3 : 'पंचायत 3'बद्दलची चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्राईम व्हिडीओची ही सीरिज आज ट्रेडिंगमध्ये आहे. या सीरिजसाठी कलाकारांनी किती मानधन घेतलंय जाणून घ्या...
Panchayat 3 : 'पंचायत' (Panchayat) या सीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आज बहुप्रतीक्षित तिसरा सीझनदेखील (Panchayat 3) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), रघुबीर यादव (Raghubir Yadav) आणि नीना गुप्ता (Neena Gupra) यांसारखे दमदार कलाकार आहेत. 'पंचायत 3' विनोदी, नाट्यमय सीरिज आहे. फुलेरा गाव, त्या गावातील गावकरी यांच्या आयुष्यावर आधारित या सीरिजचं कथानक आहे.
'पंचायत 3' अभिषेक त्रिपाठी या पात्राभोवती फिरणारी सीरिज आहे. अभिनेता जितेंद्र कुमारने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिषेक सरकारी नोकरीत फसतो. उत्तर प्रदेशातील फुलेरा गावात त्याला जावं लागतं. सचिव जी आणि प्रधान जीचे चाहते आज प्राईम व्हिडीओवर 'पंचायत 3' पाहत आहेत. या सीरिजसाठी कलाकारांनी किती मानधन घेतलंय जाणून घ्या...
जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) : 'पंचायत 3' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार सचिव म्हणजेच अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकेत आहे. जितेंद्रने या सीरिजसाठी प्रति एपिसोड 70 हजार रुपयांचं मानधन घेतलं आहे.
रघुबीर यादव (Raghubir Yadav) : प्रधान जी उर्फ मंजू देवीच्या पतीची भूमिका रघुबीर यादवने निभावली आहे. या भूमिकेसाठी प्रति एपिसोड त्यांनी 40 हजार रुपये चार्ज केले आहेत.
नीना गुप्ता (Neena Gupta) : नीना गुप्ता 'पंचायत 3'मध्ये सरपंचाच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. मंजू देवी असं तिच्या पात्राचं नाव आहे. 'पंचायत 3'च्या प्रत्येक एपिसोडसाठी तिने 50 हजार रुपये चार्ज केले आहेत.
चंदन रॉय (Chandan Roy) : 'पंचायत 3'मध्ये विकासच्या भूमिकेत दिसणाऱ्या चंदन रॉयने एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये आकारले आहेत.
फैसल मलिक (Faisal Malik) : उपसचिवाच्या भमिकेत दिसणाऱ्या फैसल मलिकने अर्थात प्रह्लाद चाने एका एपिसोडसाठी 20 हजार रुपयांचं मानधन घेतलं आहे.
'पंचायत 3'च्या निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्या दिवशी मोठा फटका
'पंचायत 3' या सीरिजची प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. पण सीरिज रिलीज झाल्या-झाल्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ही सीरिज एचडीमध्ये ऑनलाईन लीक झाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतुक करत आहेत. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता. रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक, सुनीता राजवार, पंकज झा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या