
Panchayat 3 Ammaji Abha Sharma : वयाच्या पस्तीशीत सगळे दात पडले, 54व्या वर्षी मिळाली अभिनयाची संधी; 'पंचायत'मधील अम्माजीचा डोळे पाणावणारा स्ट्रगल
Panchayat 3 Ammaji Abha Sharma : लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आभा यांचे स्वप्न 54 व्या वर्षी पूर्ण झाले.

Panchayat 3 Ammaji Abha Sharma : 'पंचायत' (Panchayat Season 3) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या सीझनमधील काही व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या सीझनमध्ये अम्माजींनी आपल्या सहज अभिनयाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अम्माजीच्या तोंडी असलेल्या 'मन कुछ अच्छा नहीं लग रहा' या संवादावर सोशल मीडियावर मीम्स येत आहेत. अम्माजींची व्यक्तीरेखा आभा शर्मा या अभिनेत्रीने साकारली आहे. 'पंचायत 3' नंतर आभा शर्मा यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आभा यांचे स्वप्न 54 व्या वर्षी पूर्ण झाले.
आभा शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लाईफ स्ट्रगलबाबत सांगितले. लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न होते. पण आईला हे कधीच आवडले नाही, असे आभा शर्मा यांनी सांगितले. आईचे निधन झाल्यानंतर माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली असल्याचे आभा यांनी सांगितले. त्यासाठी माझ्या बहिण-भावांनी मदत केली असल्याचेही आभा यांनी नमूद केले.
View this post on Instagram
View this post on Instagram
वयाच्या पस्तीशीत सगळे दात पडले...
आभा यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. या कारणामुळे त्यांनी कधीही लग्न केले नाही. वयाच्या 35 व्या वर्षी हिरड्यांमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे सगळे दात पडले. लखनौमध्ये आभा यांनी रंगभूमीवर काम केले. त्यानंतर मुंबईमध्ये आभा यांनी पाय ठेवले. मुंबईत एका जाहिरातीमध्ये काम मिळाले. त्यानंतर संधी मिळत गेली. परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूरसोबत इश्कजादेमध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याचे आभा शर्मा यांनी सांगितले.
आभा शर्मा यांनी लहान-सहान भूमिका साकारल्या आहेत. पण, पंचायत-3 मधील भूमिकेने त्यांना ग्लॅमर मिळून दिले आहे. लोकांकडून त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
