एक्स्प्लोर

Panchayat : 'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा

Panchayat Actor : 'पंचायत' या वेबसीरिजमधील अभिनेता आसिफ खानने आपल्या करिअरमध्ये खूप वाईट दिवस पाहिले आहेत. अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे की, सैफ अली खान आणि करीना कपूरच्या रिसेप्शन पार्टीत आसिफने वेटरचं काम केलं होतं.

Panchayat Actor : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकार सध्या चर्चेत आहेत. 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानने (Asif Khan) आपल्या करिअरमध्ये अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. संघर्षमय प्रवासात अभिनेत्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे की, त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरच्या (Karina Kapoor) रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम केलं होतं.

आसिफ खानने 'मिर्झापूर','पंचायत','पाताल लोक','पगलैट' आणि 'ह्यूमन'सारख्या ओटीटी सीरिजमध्ये काम केलं आहे. पंचायत सीरिजमधील त्याचा 'गज्जब बेज्जती है यार' हा डायलॉग चांगलाच गाजला. अभिनय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. अनेकांप्रमाणे त्याला संघर्ष करावा लागला. टॉपमध्ये राहण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. संघर्षाच्या काळात तो करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नात वेटरचं काम करत असे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आसिफ खानने अभिनेता होण्यासाठीचा त्याचा संघर्षमय प्रवास शेअर केला आहे. मायानगरीत स्वत:ला सिद्ध करणं सोपं नाही. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी आसिफच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्याने अनेक छोटी-मोठी कामे केली. 

करीना कपूर-सैफ अली खानच्या पार्टीत केलंय काम

आसिफ म्हणाला,"मी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं आहे. हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर काही दिवसांनी मी किचन डिपार्टमेंटमध्ये काम करायला लागलो होतो. हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. हॉटेलमधील ही पार्टी म्हणजे करीना कपूर आणि सैफ अली खान यांचं रिसेप्शन होतं".

आसिफ पुढे म्हणाला,"हॉटेलमधली नोकरी सोडली आणि एका मॉलमध्ये काम करायला सुरुवात केली. मॉलमध्ये काम करत असताना ऑडिशन द्यायलाही सुरुवात केली. जयपुर, राजस्थानमधील एका थिएटर ग्रुपमध्ये सामिल झालो. पुढे कास्टिंग असिस्टंट म्हणून तो काम करू लागला. 'टॉयलेट:एक प्रेम कथा','परी','पगलॅट' सारख्या अनेक चित्रपटांत आसिफने छोट्या-मोठ्या भूमिका स्वीकारल्या. 

'पंचायत 3'बद्दल जाणून घ्या...

'पंचायत 3' ओटीटी विश्वातील लोकप्रिय सीरिज आहे. आतापर्यंत या सीरिजचे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 28 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज झाली आहे. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 60-80 कोटींच्या बजेटमध्ये या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Faisal Malik on Kangana Ranaut : शिव्या कार्यकर्ता खातो अन् सेलिब्रिटीला थेट खासदारकीचं तिकिट मिळतं, कंगनाच्या एन्ट्रीवर 'पंचायत'चे उपप्रधान प्रल्हादजी काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका

व्हिडीओ

Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
Embed widget