एक्स्प्लोर

Panchak movie Trailer out: प्रतीक्षा संपली! माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Panchak movie Trailer out: पंचक या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Panchak movie Trailer out: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit) आणि डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांच्या पंचक (Panchak) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

पंचक या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला काही कलाकार धावताना दिसत आहेत. त्यानंतर एका कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते. त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला पंचक लागते. ट्रेलरमध्ये अभिनेते विद्याधर जोशी हे पंचक लागणे म्हणजे काय असते? याचा अर्थ सांगताना दिसत आहेत. ते म्हणतात, "पंचक लागलं म्हणजे मृत्यूच्या घटकेपासून एका वर्षाच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा जवळचे पाच मृत्यू संभवतात." हे ऐकल्यानंतर कुटुंबातील सर्वच व्यक्ती घाबरतात. 

पंचक चित्रपटात 'या' कलाकारांनी साकारली भूमिका 

पंचक या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी सागर शोध, संपदा कुलकर्णी ,आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि  आरती वडगबाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. माधुरी दीक्षितनं नुकताच पंचक या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, "सगळेच विचारतायत ‘आता कोणाचा नंबर?’होऊ दे चर्चा, घेऊन आलोय ‘पंचक’ चा ट्रेलर !! 5 जानेवारीपासून थिएटर्समध्ये लागणार हास्याचा पंचक."

पाहा पंचक चित्रपटाचा ट्रेलर:

View this post on Instagram
 
A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

पंचक कधी होणार रिलीज? (Panchak Release Date)

5 जानेवारी 2024 रोजी पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांच्या वर्षाची सुरुवात ही मनोरंजनानं होणार आहे. माधुरी दीक्षित आणि  श्रीराम नेने यांनी ‘15 ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता त्यांचा पंचत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या

Panchak Official Teaser: "आता नंबर कोणाचा?"; माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटाच्या टीझरचं नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget