एक्स्प्लोर

200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, रणवीर सर्वात तरुण अभिनेता

वयाच्या 32 व्या वर्षी रणवीरने 200 कोटींच्या क्लबमध्ये शिरणारा सर्वात तरुण अभिनेता होण्याचा मान पटकवला आहे.

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' चित्रपट पाहून प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र रणवीर सिंगने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेला सर्वांनीच मनापासून दाद दिली आहे. यासोबतच रणवीरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतातील कमाईत 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा रणवीर सिंग हा सर्वात तरुण अभिनेता ठरला आहे. पद्मावत चित्रपटाने सोमवार (5 फेब्रुवारी) पर्यंत देशात 219 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पद्मावत हा चित्रपट जितका पद्मावती साकारणाऱ्या दीपिकाचा आहे, तितकाच, किंबहुना तिच्यापेक्षा जरासा जास्तच खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगचा आहे. वयाच्या 32 व्या वर्षी रणवीरने 200 कोटींच्या क्लबमध्ये शिरणारा सर्वात तरुण अभिनेता होण्याचा मान पटकवला आहे. चित्रपट अभ्यासक रमेश बाला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अल्लाउद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रणवीर सिंगने कठोर मेहनत घेतली आहे. फक्त शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही त्याला तयारी करावी लागली. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या प्रतिसादामुळे रणवीरला झोकून देऊन काम केल्याचं चीज झाल्यासारखं वाटत आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश 200 कोटींच्या क्लबमध्ये झाला आहे. दंगल, पीके, बाहुबली 2, सिक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान हे चित्रपट ऑल टाईम कलेक्शनमध्ये पहिल्या पाचात आहेत. त्याशिवाय सुलतान, टायगर जिंदा है, धूम 3, चेन्नई एक्स्प्रेस, प्रेम रतन धन पायो, 3 इडियट्स यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींच्या क्लबमध्ये गेलेल्या चित्रपटांमध्ये आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान या पन्नाशीतील तीन खान मंडळींचं वर्चस्व आहे. त्याशिवाय अक्षय कुमार, प्रभास, हृतिक रोशन, सैफ अली खान, अजय देवगन या अभिनेत्यांचे प्रत्येकी एखाद-दुसरे सिनेमे आहेत. आतापर्यंत 200 कोटींच्या क्लबमध्ये जाणाऱ्या बाहुबली (1 आणि 2) चा 38 वर्षीय प्रभास या यादीतील सर्वात तरुण अभिनेता होता. (बाहुबली चित्रपट बॉलिवूडचा नसला, तरी भारतीय आहे) तर बॉलिवूडपटांबद्दल बोलायचं झाल्यास 44 वर्षीय हृतिकचं नाव घेता येईल. मात्र रणवीर या सर्वांमध्ये सर्वात तरुण ठरला आहे

महत्त्वाच्या बातम्या

Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Embed widget