OTT : सुष्मिता सेन, रवीना टंडन ते शिल्पा शेट्टी; चाळीशी पार केलेल्या अभिनेत्रींनी गाजवला ओटीटी प्लॅटफॉर्म
Bollywood Actress : बॉलिवूडच्या अनेक 40 पार केलेल्या अभिनेत्री सध्या ओटीटी विश्व गाजवत आहेत. यात सुष्मिता सेन (Sushmita Sen) ते शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.
OTT : कोरोनाकाळानंतर घरबसल्या सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. सिनेमागृहापेक्षा ओटीटीवर सिनेमे पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे.बॉलिवूडच्या अनेक 40 पार केलेल्या अभिनेत्री सध्या ओटीटी विश्व गाजवत आहेत. यात सुष्मिता सेन (Sushmita Sen) ते शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.
रवीना टंडन (Raveena Tondon)
अभिनेत्री रवीना टंडनने 'अरण्यक' (Aranyak) या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. रवीनाची 'कर्मा कॉलिंग' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. नुकताच या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये ती रवीना इंद्राणी कोठारी नामक अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. रुचि नरेन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 26 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुष्मिता सेन (Sushmita Sen)
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. नुकताच तिच्या आगामी 'आर्या 3' या वेबसीरिजचा टीझर आऊट झाला आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता सेन शत्रूंसोबत लढताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही बहुचर्चित सीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
बॉलिवूड गाजवल्यानंतर शिल्पा शेट्टी आता ओटीटी विश्व गाजवायला सज्ज आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 19 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma)
कोंकणा सेन शर्मा ही ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कोंकणाची 'किलर सूप' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 11 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये कोंकणा पहिल्यांदाच मनोज बाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)
माधुरी दीक्षितने 'मजा मा' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. तिची ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता माधुरीच्या आगामी ओटीटी कलाकृतीची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या