एक्स्प्लोर

OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिज पाहताना आता दिसणार 'ही' सूचना?

चित्रपटगृहांमध्ये आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स दाखवण्यात येतात, तसेच डिस्क्लेमर्स आता ओटीटीवर देखील दाखवण्यात येतील, असं म्हटलं जात आहे.

OTTओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platform) लवकरच तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स प्रदर्शित करणे बंधनकारक केले जाऊ शकते. जसे चित्रपटगृहांमध्ये आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स दाखवण्यात येतात, तसेच डिस्क्लेमर्स आता ओटीटीवर देखील दाखवण्यात येतील, असं म्हटलं जात आहे. याबाबत आरोग्य मंत्रालय (Health Ministry) संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी गुरुवारी (25 मे) पीटीआय या वृत्तसंस्थेला  सांगितले. आरोग्य मंत्रालय हे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियम 2004 मध्ये, सुधारणा करण्यावर सक्रियपणे विचार करत आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.

तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दर्शविणाऱ्या ऑनलाइन कंटेन्टच्या प्रकाशकांना त्या कंटेन्टच्या सुरुवातीला आणि मध्ये किमान 30 सेकंद तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स दाखवावे लागू शकतात, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे.

चित्रपटांमध्ये (Movie)  तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दाखवण्यात येत असताना स्क्रीनच्या खाली संदेश म्हणून त्यांना तंबाखूविरोधी डिस्क्लेमर दाखवला जातो.  ऑडिओ-व्हिज्युअल डिस्क्लेमर चित्रपटाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी दाखवावा लागतो, ज्यामध्ये तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दर्शविले जातात. 

तंबाखूजन्य पदार्थांचा वापर आणि धूम्रपान हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platforms ) प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये डिस्क्लेमर शिवाय मोठ्या प्रमाणावर दाखवले जाते. त्यामुळे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 चे स्पष्ट उल्लंघन होते.

चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये अनेक सिन्समध्ये कलाकार हे व्यसन करताना दिसतात. अनेक वेळा या कलाकरांना पाहून प्रेक्षक प्रेरित होत असतात. अनेक वेळा चित्रपट आणि वेब सीरिज तरुण मुलं आणि मुली देखील बघत असतात. ओटीटीवरील कंटेन्टमधील आपल्या आवडत्या कलाकाराला व्यसन करताना पाहून अनेक वेळा मुलं आणि मुलींना देखील व्यसन करण्याची इच्छा होते.  

ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना मिळते प्रेक्षकांची पसंती

 ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित  चित्रपट आणि वेब सीरिज  (Web Series) प्रदर्शित केल्या जातात.  कोरोनानंतर ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये इतकी आवड निर्माण झाली आहे की,  आता चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी दिसत आहे. बॉलिवूडमधील स्टार्सही  ओटीटीवर डेब्यू करत आहेत. ओटीटीवर  वेब सीरिज आणि चित्रपट लोक घरबसल्या पाहू शकतात. ओटीटीवर अनेक शॉर्ट फिल्म्स देखील प्रेक्षक पाहू शकतात. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Most Expensive Hindi Web Series: द फॅमिली मॅन ते मिर्झापूर; या वेब सीरिजच्या निर्मितीसाठी कोट्यवधींचा खर्च, जाणून घ्या बजेटबद्दल

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget