Most Expensive Hindi Web Series: द फॅमिली मॅन ते मिर्झापूर; या वेब सीरिजच्या निर्मितीसाठी कोट्यवधींचा खर्च, जाणून घ्या बजेटबद्दल
काही वेब सीरिजचे (Web Series) बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

Most Expensive Hindi Web Series: गेल्या काही वर्षांत, ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिजची (Web Series) लोकप्रियता वाढली आहे. विशेषत: कोरोनानंतर ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये इतकी आवड निर्माण झाली आहे की, आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी कमी दिसत आहे. बॉलिवूडमधील स्टार्सही ओटीटीवर डेब्यू करत आहेत.'फर्जी' या वेब सीरिजमधून शाहिद कपूनं ओटीटीवर पदार्पण केलं . तर अजय देवगणनेही 'रुद्र' चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे. काही वेब सीरिजचे बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...
मेड इन हेवन (Made in Heaven)
मेड इन हेवन या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकप्रिय आणि हिट सीरिजच्या पहिल्या सीझनचे बजेट 100 कोटी रुपये होते. पहिल्या सीझनमध्ये मोठे सेट होती. या सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला आणि जिम सरभ यांच्यासोबत अर्जुन माथूर, कल्की केकला, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
मिर्झापूर (Mirzapur)
मिर्झापूर या वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. कलेन भैया, गुड्डू, बबलू, गोलू गुप्ता आणि मुन्ना भैया या मिर्झापूर वेब सीरिजमधील भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची निर्मिती 60 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली. मिर्झापूर सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा हे कलाकार दिसले होते.
'द फॅमिली मॅन' (The Family Man)
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या सीरिजचे 2 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजच्या दोन्ही सीझनची निर्मिती 50-50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
'सेक्रेड गेम' (Sacred Games)
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सेक्रेड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजचा पहिला सीझन 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, तर पहिल्या सीझनच्या उत्कृष्ट यशानंतर, निर्मात्यांनी दुसरा सीझन ₹ 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवला.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
