Oscars 2024 : ऑस्करमध्ये जगभरातील सिताऱ्यांच्या गर्दीत खुर्चीवर दाबात बसलेला एक कुत्रा भाव खाऊन गेला! तो नेमका कोण?
Oscars 2024 : 'ऑस्कर 2024'मध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत एक श्वान बसला होता. या श्वानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Oscars 2024 : जगातील सर्वात प्रतिष्ठित 'ऑस्कर 2024' (Oscars 2024) हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या दिग्गज कलाकारांसोबत एका श्वानने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. या श्वानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऑस्कर नामांकित 'एनाटॉमी ऑफ अ फॉल' (Anatomy of A Fall) या सिनेमात 'मेसी' (Messi) नामक एका श्वानने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या श्वानने हजेरी लावली होती. दिग्गज सेलिब्रिटींसोबत या श्वानला पाहून नेटकरी मात्र हैरान झाले आहेत.
The #Oscars' VIP (Very Important Pup). pic.twitter.com/1zGrTqlS5v
— The Academy (@TheAcademy) March 10, 2024
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मेसी हजेरी लावणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला मेसीने हजेरी लावली. त्याच्या एन्ट्रीने उपस्थित सर्वच मंडळी हैरान झाली होती. जिमी किमेल या कार्यक्रमाची होस्ट होती. तिने जोरदार टाळ्या वाजवत मेसीचं (श्वान) स्वागत केलं. तसेच मेसीच्या अभिनयाचंही कौतुक केलं. जिमी म्हणाली,"हा श्वान असला तरी त्याने 'एनाटॉमी ऑफ अ फॉल'मध्ये सर्वोत्तम सादरीकरण केलं आहे".
Messi at the #Oscars pic.twitter.com/YLQPOivlcn
— Film Updates (@FilmUpdates) March 11, 2024
मेसीला अधिकृतरित्या 'ऑस्कर 2024'साठी नामांकन मिळालं होतं. एका श्वानला नामांकन जाहीर झाल्याने यावर वाददेखील झाले. सिनेसृष्टीतील अनेक मंडळींनी यावर विरोध दर्शवला होता.
'एनाटॉमी ऑफ अ फॉल'मध्ये मेसीची भूमिका काय?
'एनाटॉमी ऑफ अ फॉल' हा क्राइम थ्रिलर सिनेमा आहे. जस्टिन ट्रीटने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात मेसीने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. 11 वर्षीय डेनियलाला तो पाठिंबा देताना दिसतो. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह वेगवेगळ्या कॅटेगरीत नामांकन जाहीर झाले होते. सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेच्या पुरस्कारावर या सिनेमाने नाव कोरलं आहे. एका महिलेच्या आयुष्याभोवती फिरणारं या सिनेमाचं कथानक आहे.
जिमी किमेलने यंदा चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सुपरहिट सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळाला.
संबंधित बातम्या