एक्स्प्लोर

Oscars 2023 : ए. आर. रहमान ते सत्यजीत रे; 'या' भारतीय कलाकारांनी ऑस्करवर कोरलं नाव

जाणून घेऊयात ऑस्कर पुरस्कारावर (Oscar 2023) नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल...

Oscar 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. भारतातील काही कलाकारांना या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं. याआधी देखील काही कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आलं. जाणून घेऊया ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल...

भानू अथैया  (Bhanu Athaiya)

भानू अथैया हे कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. त्यांना 1982 मध्ये रिलीज झालेल्या गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन कॅटेगरीमधील अकादमी पुरस्कार (ऑस्कर) मिळाला होता. ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. 1929 मध्ये कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. 1940 च्या दरम्यान त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांनी गाईड आणि वक्त यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांचे त्यांनी  कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले.

सत्यजित रे (Satyajit Ray)

सत्यजित रे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांना 1992 मध्ये ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार जिंकणारे ते भारतात पहिले फिल्ममेकर होते. पाथर पांचाली (1955), अपराजितो (1956), अपूर संसार (1959), द म्युझिक रुम (1958), चारुलता (1964) आणि द चेस प्लेयर्स (1977) हे त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने बघतात. 

रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty)

2008 मध्ये रिलीज झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रेसुल पुकुट्टी यांना सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपटांचे साऊंड मिक्सिंग केलं आहे. 

ए.आर. रहमान (​AR Rahman)

ए.आर. रहमान हा केवळ संगीतकार नाही तर तो गायक, गीतकार आणि निर्माता देखील आहे. 2009 मध्ये ए.आर. रहमानने दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले. 

गुलजार (Gulzar)

81 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गुलजार यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी बेस्ट ओरिजनल कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एम.एम किरवाणी (M. M. Keeravani)  आणि चंद्रबोस (Chadrabose)

95 व्या अकादमी पुरस्कार (95th Academy Awards) सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यासाठी एम.एम किरवाणी आणि चंद्रबोस यांना 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला.  

गुनीत मोगा आणि  कार्तिकी गोन्साल्विस

'द एलिफंट विस्परर्स'  या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा (Best Documentary Short Film) पुरस्कार पटकावला आहे. गुनीत मोगा आणि  कार्तिकी गोन्साल्विस यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

संबंधित बातम्या

Oscar 2023 Winners Full List : 'नाटू नाटू' बेस्ट सॉन्ग तर "Everything Everywhere..." ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget