एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख शांत का होता? किंग खानने पहिल्यांदाच सोडलं मौन

Shah Rukh Khan on Aryan Khan Drug Case : शाहरुख खान 2018 नंतर त्याच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होता. शाहरुखचा मुलगा आर्यनला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगात जावं लागलं होतं.

Shah Rukh Khan on Aryan Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. डंकीआधी त्याचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे सिनेमे रिलीज झाले. किंग खानने 2023 हे वर्ष गाजवलं होतं. आता त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'पठाण' रिलीज होण्याआधी शाहरुख त्याचा लाडका लेक आर्यन खानमुळे (Aryan Khan) चर्चेत आला होता. आता ड्रग्जप्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खान शांत का राहिला याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

शाहरुख खान 2018 नंतर त्याच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होता. शाहरुखचा मुलगा आर्यनला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगात जावं लागलं होतं. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने त्याला आयुष्यात आलेल्या अडचणींवर भाष्य केलं आहे. 

शाहरुख खान म्हणाला,"गेले चार-पाच वर्षे माझ्या कुटुंबियांसाठी आणि माझ्यासाठी रोलर-कोस्टर राईडसारखे होते. कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी माझे अनेक सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यानंतर माझं करिअर संपलं असल्याच्याही बातम्यांना सुरुवात झाली". 

आयुष्यात अडचणी येतात, आशा सोडू नका : शाहरुख खान 

शाहरुख पुढे म्हणाला,"वैयक्तिक आयुष्यातदेखील मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या प्रवासात मला अनेक गोष्टी शिकता आल्या. एखाद्या समस्येवर मात करताना शांत राहायला हवं, असं मला वाटतं. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. पण आशा सोडली नाही पाहिजे". 

शाहरुखच्या 'डंकी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका (Dunki Box Office Collection)

शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. रिलीजच्या 21 दिवसांत या सिनेमाने 220.72 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.  राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखसह विकी कौशल आणि तापसी पन्नू हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'डंकी' ओटीटी रिलीज (Dunki OTT Release)

शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. जिओ सिनेमावर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. 155 कोटींमध्ये जिओ सिनेमाने या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याचं म्हटलं जात आहे. आता आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' ही सीरिज किंग खानच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या आयुष्यावर आधारित असणार आर्यनची 'स्टारडम'? बाप-लेक करणार धमाका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget