एक्स्प्लोर
विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं!
![विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं! One Decision Which Changed Life Of Veteran Actor Vinod Khanna Latest Updates विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/27154635/VINOD-KHANNA-LEAD.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
विनोद खन्ना एकेकाळी यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते. एकामागोमाग येणारे सुपरहिट सिनेमांच्या त्यांच्यासमोर निर्मात्यांची रांग लागलेली असायची. संपूर्ण बॉलिवूडचं ते आकर्षण होते. मात्र त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं.
विनोद खन्ना अर्ध्यावरच चित्रपटसृष्टी सोडून आचार्य रजनीश यांच्यासोबत अमेरिकेला जाऊन ओशोंच्या आश्रमात राहायला लागले. या निर्णयानंतर विनोद खन्नांची चित्रपट कारकीर्द काहीशी थांबली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनावरही याचा प्रभाव पडला.
काही काळानंतर विनोद खन्ना यांचा आश्रम आणि ओशोंशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची ती एंट्री एवढी दमदार ठरली नाही. त्या काळात त्यांचे दयावान आणि चांदनी हे दोनच चित्रपट हिट झाले.
विनोद खन्ना यांचे दोन विवाह झाले. त्यांनी 1971 साली गीतांजली यांच्याशी विवाह केला. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना हे त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. 1975 साली विनोद खन्ना ओशो यांचे अनुयायी झाले. त्यानंतर ते पाच वर्षांसाठी रजनीशपुरम या ठिकाणी गेले. पाच वर्षांसाठी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचा गीतांजली यांच्याशी घटस्फोट झाला. 1990 साली त्यांनी कविता यांच्याशी दुसरा विवाह केला. साक्षी आणि श्रद्धा हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलं आहेत.
विनोद खन्ना यांची कारकीर्द :
• सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पेशावरमध्ये उद्योगपतीच्या घरात 6 ऑक्टोबर 1946 रोजी जन्म. तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार.
• विनोद खन्ना यांच्या जन्मानंतर काही दिवसातच भारताचं विभाजन झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब पेशावर सोडून मुंबईत स्थायिक झालं.
• मुंबईतील सेंट मेरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण, आणि सेंट झेव्हिअर्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण
• 1957 साली कुटुंबाचं दिल्लीला स्थलांतर, त्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण.
• कुटुंबाचं 1960 साली पुन्हा मुंबईला स्थलांतर. त्यानंतर विनोद खन्ना यांना शिक्षणासाठी नाशिकमधील देवळालीच्या बार्न्स स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. शिक्षण चालू असताना ‘सोलवा साल’, मुघल-ए-आझम हे सिनेमा पाहून बॉलिवूडकडे आकर्षित.
• मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयातून कॉमर्स शाखेतून ग्रॅज्युएशन
• 1968 साली मन का मीत या सिनेमातून बॉलिवडूमध्ये पदार्पण, खलनायकाची भूमिका निभावली
• 1968 ते 2013 या काळात 141 सिनेमांमध्ये काम
• खलनायक म्हणून पदार्पण करत अभिनेता म्हणून पुढे येणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक
• मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, कच्चे धागे, अमर अकबर अँथोनी, राजपूत, कुर्बानी, दयावान, कारनामा हे गाजलेले सिनेमे
• 1982 साली पाच वर्षांसाठी बॉलिवूडमधून संन्यास
• 1987 साली ‘इन्साफ’ सिनेमातून पदार्पण. त्यानंतर जूर्म, चांदणी यासारख्या हिट सिनेमात काम
विनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द
• 1997 साली भाजपमध्ये प्रवेश, 1998 साली पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार.
• जुलै 2002 मध्ये केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी. त्यानंतर सहा महिन्यातच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
• 2004 लोकसभा निवडणुकीतून पुन्हा लोकसभेवर
• 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
• 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत विजयी
संबंधित बातम्या :
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)