एक्स्प्लोर

OMG 2 Har Har Mahadev: OMG 2 मधील 'हर हर महादेव' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; अक्षयच्या लूकनं वेधलं लक्ष

ओएमजी 2 (OMG 2) या चित्रपटामधील हर हर महादेव हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

OMG 2 New Song Out: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या ओह माय गॉड 2 (OMG 2) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.ओह माय गॉड 2  हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. तसेच या चित्रपटामधील 'ऊंची ऊंची वादी' (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं देखीर रिलीज झालं. आता या चित्रपटामधील हर हर महादेव (Har Har Mahadev) हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे.

ओह माय गॉड 2 या  चित्रपटामधील  हर हर महादेव  या गाण्याला विक्रम माँट्रोजने संगीत दिले आहे. हे गाणे विक्रमनेच गायले आहे. शेखर अस्तित्व यांनी हे गाणं लिहिले आहे. अक्षय कुमारनं सोशल मीडियावर हे गाणं शेअर केलं आहे. अक्षयनं शेअर केलेल्या या गाण्याला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन या गाण्याचं कौतुक केलं आहे. 

पाहा गाणं:  

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ओएमजी- 2 अडकला वादाच्या भोवऱ्यात:

ओएमजी- 2 हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.'ओएमजी-2'  या चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. तर एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनेही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला असून चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटातील 20 कट्स सुचवले आहेत. इतकंच नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनं चित्रपटाला 'ए' म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्याबाबत बोललं आहे.

ओएमजी-2ची स्टार कास्ट

ओएमजी-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी यांनी ओएमजी-2 या चित्रपटात कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारली आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर  रिलीज झाला होता. या टीझरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ओएमजी-2 हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या ओएमजी या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ओएमजी या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Oonchi Oonchi Waadi OMG 2 Song: पंकज त्रिपाठी महादेवाच्या चरणी लीन; ओएमजी-2 मधील 'ऊंची ऊंची वादी' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaKonkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special ReportAjit Pawar vs Chhagn Bhujbal यांच्यात सुप्त संघर्ष? 16 वर्षांचा हिशोब चुकता? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Embed widget