एक्स्प्लोर

November Movie Release : सलमानचा 'Tiger 3' ते राज कुंद्राचा 'यूटी 69'; नोव्हेंबरमध्ये होणार एंटरटेनमेंटचा धमाका

November Releases : नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

November Movie Release : ऑक्टोबर महिना दाक्षिणात्य सिनेमांनी गाजवला. लियो, भगवंत केसरी, टायगर नागेश्वर राव, घोस्ट असे अनेक सिनेमे या महिन्यात प्रदर्शित झाले. तर दुसरीकडे 'गणपत' आणि 'तेजस' हे बॉलिवूडपटही प्रदर्शित झाले. पण दाक्षिणात्य सिनेमे पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. आता नोव्हेंबर (November Movie Release) महिनाही मनोरंजनसृष्टीसाठी खूप खास असणार आहे. सलमानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3)  ते राज कुंद्राचा (Raj Kundra) 'यूटी 69' (UT 69) असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

टायगर 3 (Tiger 3)
कधी प्रदर्शित होणार? 12 नोव्हेंबर

'टायगर 3' हा नोव्हेंबर महिन्यातील बिग बजेट सिनेमा आहे. सलमान खानच्या (Salman Khan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात सलमान कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

यूटी 69 (UT 69)
कधी प्रदर्शित होणार? 3 नोव्हेंबर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. राज कुंद्रा 'यूटी 69' (Ut 69) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. कुंद्रानेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

खिचडी 2 (Khichdi 2)
कधी प्रदर्शित होणार? 17 नोव्हेंबर

'खिचडी' हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'खिचडी 2' (Khichdi 2) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'खिचडी 2' हा सिनेमा 17 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सुप्रिया पाठक, राजीव मेहता, अनग देसाई, वंदना पाठक, जमनादास मजेठिया, कीर्ती कुल्हरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

लकीरें (Lakeerein)
कधी प्रदर्शित होणार? 3 नोव्हेंबर

'लकीरें' हा सिनेमा 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुर्गेश पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आषुतोष राणा आणि बिदिता बाग या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

फर्रे (Farrey)
कधी प्रदर्शित होणार? 24 नोव्हेंबर

'फर्रे' हा सिनेमाही 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रजर्शित होणार आहे. या सिनेमात अलीजेह अग्नीहोत्री, जुही बब्बर, प्रसन्ना बिष्ट आणि साहिल मेहता महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

The Lady Killer : अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरच्या 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! रोमान्स, द्वेष अन् बरचं काही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget