Nora Fatehi : 'उगाचच शरीराच्या नको 'त्या' भागांवर झूम करत असतात', नोरा फतेहीने व्यक्त केला पापराझींवरील राग
Nora Fatehi : नोरा फतेही ही पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर नेहमीच कम्फर्टेबल दिसते. पण नुकतच नोराने पापाराझींवरील तिची नाराजी व्यक्त केली आहे.
Nora Fatehi on Paparazzi : तसं पाहायला गेलं तर फिल्म स्टार्सचं ग्लॅमर पापाराझीशिवाय अपूर्ण आहे. बऱ्याचदा पापाराझी आणि फिल्मस्टार्समधील कनेक्शन हे फार चांगलं असतं. त्याचप्रमाणे अनेकदा सेलिब्रेटी या पापाराझींवर भडकतात देखील. अनेकदा कलाकार पापाराझींना फटकारताना किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक कलाकार हे पापाराझींविषयी राग व्यक्त करताना देखील दिसतात. अशीच काहीशी नाराजी नोरा फतेही (Nora Fatehi) हीने व्यक्त केली आहे.
पण अनेकदा या पापाराझींविषयी अभिनेत्री त्यांचा अनुभव सांगतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की पापाराझी त्यांच्या शरीराचे अवयव झूम करण्याचा प्रयत्न करतात.नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींनी तिला बॅक पोझ देण्यास सांगितल्यावर तिने त्यांना नकार दिला होता. पण तरीही तिचे बॅक फोटो घेण्याचा पापाराझींनी प्रयत्न केला. अभिनेत्री नोरा फतेही ही देखील अनेकदा पापाराझींसमोर बिंधास्त पोझ देताना दिसते. पण नुकतच नोराने त्यांच्यावरील नाराजी देखील व्यक्त केली आहे.
उगचच शरीराचे इतर अवयव झूम करतात - नोरा फतेही
न्यूज18 शोशाशी याबद्दल बोलताना नोरा म्हणाली,मला वाटते की त्यांनी (पापाराझी) याआधी कधीही कोणाचीही पाठ पाहिली नाही आणि जे आहे ते आहे. हे माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबतही होतं. पण कदाचित त्यांच्या पाठिवर झूम केलं जात नाही, कारण ते तितकं खास वाटत नसेल. परंतु ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवर झूम करतात. कधीकधी मला वाटते की झूम इन करण्यासारखे काहीही नाही मग ते कशावर लक्ष केंद्रित करत असतात? असा सवाल देखील नोराने विचारला आहे.
मला माझ्या शरीराचा अभिमान - नोरा
नारोने स्वत:च्या शरीरावर बोलताना म्हटलं की, माझ्याकडे खूप सुंदर शरीर आहे आणि मला माझ्या शरीरावर गर्व आहे. मी अजिबात त्या गोष्टींबाबत लाजत नाही. नोरा फतेही ही साजिद खान दिग्दर्शित 'हाऊसफुल 5' आणि '100 पर्सेंट' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram