Divyanka Tripathi : टूथपेस्टचे डब्बे विकले, दूरदर्शनमध्ये नोकरी केली, आता घेतेय कोटींचं मानधन; दिव्यांका त्रिपाठीचा स्ट्रगलर प्रवास
Divyanka Tripathi : मालिकाविश्वातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरली आहे.तिच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात.
Divyanka Tripathi : अभिनय क्षेत्रात काम मोठं नाव मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) ही देखील याच कलाकारांच्या यादीतलं नाव आहे. दिव्यांकानं अभिनय क्षेत्रात जितकं मोठं नाव कमावलं आहे, तितकाच तिचा प्रवास खडतर आहे. या अभिनेत्रीने 'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून बरीच प्रसिद्धी मिळवली. पण तिला खरी ओळख दिली ती 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेने. पण त्याआधी दिव्यांकाचा प्रवास हा सोपा नव्हता.
दिव्यांका त्रिपाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिला आणि तिच्या बहिणींना कायमच अभ्यासावरच लक्ष देण्यास सांगण्यात आलं. तिचे वडिल नरेंद्र त्रिपाठी एक फार्मासिस्ट आहेत आणि तिची आई गृहिणी. दिव्यांका मुळची भोपाळची आणि तिचं शालेय शिक्षणही तिथेच झालं. त्यानंतर तिने सरोजिनी नायडू मुलींच्या महाविद्यालयातून तिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
दिव्यांकाला व्हायचं होतं गिर्यारोहक
दिव्यांकाचा इंडस्ट्रीत येण्याचा कोणताही विचार नव्हता. खरंतर तिला गिर्यारोहक व्हायचं होतं. तिचे ध्येय साध्य करण्यासाठी, दिवाने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून गिर्यारोहणाचा कोर्स देखील केला.मात्र, जसजशी तिची प्रगती होत गेली, तसतसे दिव्यांकाने ऑल इंडिया रेडिओवर अँकर म्हणून करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याने अनेक शोमध्ये भाग घेतला आणि कास्टिंग डायरेक्टर्सचे लक्ष वेधून घेतले.
दूरदर्शनपासून केली सुरुवात
फार कमी लोकांना माहित असेल की दिव्यांका त्रिपाठीने दूरदर्शनच्या टेलिफिल्ममधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी दूरदर्शनचा लोकप्रिय शो 'आकाश वाणी'ही होस्ट केला. यानंतर दिव्यांकाने 'दिल चाहते मोर' आणि 'विरासत' सारख्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. एका वर्षानंतर म्हणजेच 2006 मध्ये दिव्यांकाला तिचा मोठा ब्रेक मिळाला जेव्हा तिला झी टीव्हीचा ड्रामा फिक्शन 'बनू में तेरी दुल्हन' मिळाला.
टूथपेस्टचे डब्बे भंगार म्हणून विकले
दिव्यांका त्रिपाठीने अनेक शोमध्ये काम केले असले तरीही तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दिव्यांकाला तिच्या आयुष्यातील काही ठरावीक टप्प्यांवर पैशांच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. दिव्यांकाने खुलासा केला की ती पैसे कमावण्यासाठी काहीही करत होती, जसे की टूथपेस्टचे बॉक्स साठवणे आणि भंगार म्हणून विकणे.
दिव्यांकाच्या मालिका
अगदी काही दिवसांतच तिच्या मोहब्बते मालिकेचा टीआरपी वाढला आणि काही वेळातच शोचा टीआरपी वाढला आणि दिव्यांका घराघरात प्रसिद्ध झाली. यानंतर दिव्यांकाने 'झुम इंडिया', 'मिसेस अँड मिस्टर शर्मा अलाहाबादवाले', 'जोर का झटका: टोटल वाइपआउट', 'चिंटू चिनकी और एक बडी सी लव्ह स्टोरी' सारख्या अनेक कार्यक्रम आणि मालिकांमध्ये काम केलं.
दिव्यांकाचं वैयक्तिक आयुष्य
दिव्यांकाला जसे तिच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले तसेच वैयक्तिक आयुष्यातही पाहायला मिळाले. 2006 मध्ये ती 'बनू मैं तेरी दुल्हन'या मालिकेतील तिचा सहकलाकार शरद मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्यांच्या या नात्याचा शेवट वाईट झाला. काही वर्षांनंतर, 16 जानेवारी 2016 रोजी, दिव्यांकाने 'ये है मोहब्बतें'च्या विवेक दहियासोबतचं तिचं नातं जाहीर केलं. त्या दोघांनी 8 जुलै 2016 रोजी लग्नगाठ बांधली.