Nitin Manmohan Hospitalized : हृदयविकाराचा झटका आल्याने सिने-निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात दाखल; उपचार सुरू
Nitin Manmohan : लोकप्रिय सिने-निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nitin Manmohan Hospitalized : हिंदी सिने-सृष्टीतील लोकप्रिय सिने-निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन यांनी 'दस', 'लाडला' आणि 'बोल राधा बोल' सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नितीन मनमोहन उपचारांना प्रतिसाद देत असले तरी धोका अजून टळलेला नाही. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. सध्या त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
Nitin Manmohan gets hospitalized after suffering from a heart attack pic.twitter.com/qI00rUNE2T
— Bollywood Updates (@bollywoodlikez) December 4, 2022
नितीन मनमोहन यांना भेटण्यासाठी अक्षय खन्नासह अनेक सेलिब्रिटी देखील रुग्णालयात गेले होते. अक्षय खन्ना यांनी नितीन यांच्यासोबत 'गली गली चोर है', 'दिवांगी' आणि 'सब कुशल मंगल' सारखे अनेक सिनेमे केले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सेलिब्रिटींसह चाहते प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' सारख्या अनेक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारलेल्या मनमोहन यांचा मुलगा म्हणजेच नितीन मनमोहन. नितीन मनमोहन यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांनी अभिनयाची संधी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीतून वाईट बातम्या समोर येत आहेत. अनेक सेलिब्रिटींना कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने आपला जीव जमवावा लागला आहे.
संबंधित बातम्या
Vijay Sethupathi: विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना; 20 फुटांवरुन कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
