एक्स्प्लोर

Vijay Sethupathi: विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना; 20 फुटांवरुन कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू

विदुथलई (Viduthalai) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंटमॅन सुरेश हा एक स्टंट परफॉर्म करत होता. तेव्हा अचानक एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत स्टंटमॅन सुरेशचा मृत्यू झाला आहे. 

Vijay Sethupathi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi)  विदुथलई (Viduthalai) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंटमॅन सुरेश हा एक स्टंट परफॉर्म करत होता. तेव्हा अचानक एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत स्टंटमॅन सुरेशचा मृत्यू झाला आहे. 

काय घडलं? 
विदुथलई चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना दुर्घटना घडली. वंडलूरमध्ये विदुथलई चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. सुरेश हा मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत असिस्टंट म्हणून काम करत होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. सुरेश हा त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे उपस्थित होते. त्याला दोरीने बांधून उडी मारण्याचा स्टंट करायचा होता. रिपोर्टनुसार, सुरेशला दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधण्यात आले. सीनचे शूटिंग सुरू होताच ती दोरी तुटली. त्यानंतर सुरेश हा 20 फूट उंचीवरून खाली पडला. सुरेशला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

सेटवर घडलेला संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरेश 25 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत होता. विदुथलई चित्रपटाचे शूटिंग दोन भागात होणार होते, मात्र या अपघातामुळे शूटिंग रखडले आहे. विदुथलई या चित्रपटात विजय सेतुपतीसोबतच अभिनेता प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भावानी श्री, राजीव मेनन, चेतन हे देखीलव प्रमुख भूमिका साकारणार आहेत. विदुथलई या चित्रपटातील काही सीन्स सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत. 

काही दिवसांपूर्वी विजय सेतुपतीचा डीएसपी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. विजय सेतुपतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay Sethupathi (@actorvijaysethupathi)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vijay Sethupathi Birthday : सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास


 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: 'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Live blog updates: 'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Embed widget