एक्स्प्लोर

Gadkari Movie: नितीन गडकरी, सेन्सॉर बोर्ड अन् कामचुकार अधिकारी; 'गडकरी' सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'गडकरी' (Gadkari) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट नुकताच नागपूर (Nagpur) येथे पार पडला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील हजेरी लावली होती.

Gadkari Movie: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या  आजवरच्या  कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie)   हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट नुकताच नागपूर (Nagpur) येथे पार पडला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच काही किस्से देखील त्यांनी यावेळी सांगितले.

"गडकरी" या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये  देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नितीन गडकरी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांशी ज्या शब्दात बोलतात, ते आपलं सेन्सर बोर्ड पास करू शकत नाही. म्हणून त्या संदर्भातला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सीरिजच्या स्वरूपात आणावं लागेल."

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "खरं पाहिलं तर गडकरी यांनी नागपुरी बाणा  कायम ठेवला आहे. आणि ते जसे आहे तसेच देशाने ही त्यांना स्वीकारले आहे. कारण त्यांचा स्वभाव मोकळा आहे. जे मनात आहे, तेच त्यांच्या मुखात आहे. जेव्हा आम्ही हा चित्रपट पाहू त्यानंतर चित्रपट बनवणाऱ्यांना गडकरी यांच्याबद्दल आणखी माहिती देऊ. त्या माहितीच्या आधारे त्यांना गडकरी पार्ट टू बनवता येईल आणि माझा विश्वास आहे गडकरी पार्ट टू लोकांना आणखी जास्त आवडेल."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रत्नांच्या मांदियाळीमधील सर्वात महत्वपूर्ण रत्न म्हणजे नितीन गडकरी आहेत. मोदींच्या कार्यक्षम मंत्रिमंडळात कार्यक्षमतेची मर्यादा ओलांडून काम करणारा मंत्री म्हणजे नितीन गडकरी", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

गडकरी या चित्रपटामध्ये  नितीन गडकरी यांची भूमिका अभिनेता राहुल चोपडा (Rahul Chopda) हा साकारणार आहे. गडकरी हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. 'गडकरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग राजन भुसारी यांनी सांभाळली आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Nitin Gadkari : "...तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी"; भारताचे 'हायवेमॅन' यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी'चा टीझर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget