(Source: Poll of Polls)
Nitin Gadkari : "...तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी"; भारताचे 'हायवेमॅन' यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी'चा टीझर आऊट
Nitin Gadkari Movie : भारताचे हायवेमॅन नितिन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
Nitin Gadkari Movie : भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) हे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या 'गडकरी' (Gadkari) सिनेमाची घोषणा झाली. तेव्हापासून चाहते या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे.
'गडकरी'च्या टीझरमध्ये काय आहे? (Gadkari Teaser Out)
'गडकरी' या सिनेमाच्या टीझरमध्ये गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा आवाज ऐकू येत आहे. अभिनेता म्हणत आहे,"या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्यांनी होईल तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी...". भारताचे हायवेमॅन नितिन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'गडकरी' (Gadkari Movie Release Date)
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच ''या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी...'' या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टrझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना 27 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
'गडकरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग राजन भुसारी यांनी सांभाळली आहे. या सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले,"नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे 'गडकरी'मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल".
संबंधित बातम्या