Nitin Gadkari: 'गडकरी' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका; चित्रपटाचं नवं पोस्टर पाहिलंत?
Nitin Gadkari: 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
Nitin Gadkari: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर आणि या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नुकतेच गडकरी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे.
'हा' अभिनेता साकारणार भूमिका
गडकरी या चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका अभिनेता राहुल चोपडा (Rahul Chopda) हा साकारणार आहे. नुकतेच गडकरी फिल्म या इन्स्टाग्राम पेजवरुन गडकरी या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये राहुल चोपडा दिसत आहे. या पोस्टरला कॅप्शन देण्यात आलं, "देशाच्या विकासासाठी कटिबद्ध, अभ्यासू आणि प्रभावी वक्ते, भारताचे केंद्रीय मंत्री, हायवेमॅन 'श्री. नितीन गडकरी' यांच्या भूमिकेत अभिनेता राहुल चोपडा. 'गडकरी' 27 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत"
View this post on Instagram
गडकरी चित्रपटाची स्टार कास्ट
गडकरी फिल्म या इन्स्टाग्राम पेजवरुन गडकरी या चित्रपटामधील कलाकारांची माहिती देण्यात आली आहे. गडकरी या चित्रपटात कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले मोहरीर ही अभिनेत्री साकारणार आहे. वेदांत देशमुख हा या चित्रपटात श्रीपाद रिसालदार यांची भूमिका साकारणार आहे. तृप्ती काळकर, पुष्पक भट हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
'गडकरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत. आता 'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: