कांचीपुरम साडीवर 100 मंदिरांची प्रतिकृती, गळ्यात 200 वर्षे जुनं पेंडंट; नीता अंबानी यांच्या अमेरिकेतील पेहरावाची सगळीकडे चर्चा!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी अमेरिकेत दाखल झाले आहेत.
वाॉशिंग्टन डीसी : आज डोनाल्ड ट्रम्प (donald trump Oath Ceremony) अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) हे देखील अमेरिकेत दाखल झाले आहेत. या सोहळ्या दरम्यान आयोजित एका समारंभात मुकेश आणि निता अंबानी उपस्थित होते. यावेळी निता अंबानी यांनी आपल्या साडीतून भारतीय हातमागाच्या समृद्ध संस्कृतीचं प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर केल्याचे पाहायला मिळाले.
बी.कृष्णमूर्ती यांनी तयार केली साडी
निता अंबानी यांनी कांचिपुरम साडी नेसली होती. भारतातल्या कांचिपुरम मधल्या विविध १०० मंदिरातील प्रतिकृती त्यांचा या साडीवर विणल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी.कृष्णमूर्ती यांनी ही साडी तयार केली आहे. या साडीत इरुथलाई पक्षी (भगवान विष्णूचे प्रतीक असलेले दुहेरी डोके असलेले गरुड), मयिल (देवत्व आणि अमरत्वाचे प्रतीक) आणि सोरगावसल म्हणजेच भारताच्या लोककथेचा उत्सव साजरा करणारे काही मोटीव्हज् पहायला मिळत आहेत.
कांचीपुरम साडीवर वेलवेटचा ब्लाऊज
या साडीला कन्टेम्पररी लूक देण्यासाठी, नीता अंबानी यांनी या कांचीपुरम साडीवर वेलवेटचा ब्लाऊज परिधान केला आहे, ज्याच्या गळ्याला आणि हाताला बिड्सचं वर्क केलेलं पहायला मिळतयं. हा ब्लाऊज डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलं आहे.
गळ्यातील पेंडंट 200 वर्षे जुनं
निता अंबानींच्या या पेहरावातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गळ्यात घातलेलं पेंडट. हे पेंडंट तब्बल 200 वर्षे जुनं आहे. पोपटाच्या आकाराचं हे पेंडंट पाचू, रुबी आणि मोती जडीत आहे.
भारतीय परंपरा, कलाकुसर सर्वांचं लक्ष वेधलं
नीता अंबानींनी या सोहळ्याला भारतीय परंपरा, कलाकुसर आणि संस्कृतीचं जागतिक पातळीवर घडललेलं दर्शन सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल