एक्स्प्लोर

Nishi Singh Passed Away : अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन; आजारासोबतची झुंज अपयशी

Nishi Singh : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन झाले आहे.

Nishi Singh Passed Away : मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'कुबूल है', 'तेनाली राज', 'इश्कबाज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह आजारी होत्या. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून निशी यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वीच निशी यांनी त्यांचा 50 वां वाढदिवस साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. निशी सिंह यांचे पती संजय सिंहदेखील मनोरंजनक्षेत्रात काम करतात. अभिनयासोबत ते लेखनदेखील करतात.

निशी सिंह यांच्या निधनाची माहिती देत पती संजय सिंह म्हणाले की,"निशी सिंह यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी निशी यांची तब्येत पुन्हा बिघडली.

निशी सिंह गेल्या आठ वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. मालिकांसोबत त्यांनी अनेक सिनेमांतदेखील काम केलं आहे. 'कुबूल है' या मालिकेत निशी सिंह हसिना बीवीच्या भूमिकेत दिसून आल्या आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजय सिंह भाडली आणि दोन मुलं असा परिवार आहे.

संजय सिंह यांनी पत्नी निशीची शेवटची इच्छाही पूर्ण केली आहे. घशाच्या संसर्गामुळे त्या काही दिवसांपासून अन्नात फक्त द्रव घेत होत्या. त्यामुळे निशी यांनी वाढदिवसादिवशी तिचा आवडता बेसन लाडूही खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिने बेसन लाडू खाल्लाही.

मान्सून वेडिंग या सिनेमात निशी यांनी काम केले होते. त्यानंतर कमल हसन आणि मामूटीचा चित्रपट केला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.

संबंधित बातम्या

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसला दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स; 19 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश

Prajakt Deshmukh : नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग, 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Embed widget