Nikki Tamboli : निक्की तांबोळीचा किलर लूक, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Nikki Tamboli : अभिनेत्री निक्की तांबोने हिरव्या रंगाच्या सूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा हा बोल्ड अवतार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Nikki Tamboli : अभिनेत्री निक्की तांबोळी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. नुकतेच तिने हिरव्या रंगाच्या सूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. निक्कीच्या फोटोंनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटचा धुमाकुळच घातला आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधून निक्कीने प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता ती सोशल मीडियावरून अजून प्रसिद्धी मिळवत आहे.
निक्कीने लीडिंग मॅगझिनसाठी नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा किलर लूक पाहायला मिळत आहे. या फोटोशूटसाठी निक्की तांबोळीने शर्टलेस ब्लेझरसह उंच कमर पॅन्ट घातली आहे. निक्कीने तिच्या इंस्टाग्रामवर हा हॉट फोटो शेअर केल्यापासून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निक्कीच्या फोटोचे चाहते कौतुक करत आहेत. एवढेच नाही तर या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. याबरोबरच अनेक चाहत्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
फोटोशूट करताना निक्कीने मेकअप कमी केला आहे. परंतु, तिचा हा बोल्ड अवतार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. निक्की तांबोळीला नेहमीच टिप टॉपसारखे फिरायला आवडते. तिची फॅशन, स्टाइल आणि पोशाख नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहेत. फोटोमध्ये जबरदस्त आकर्षक लूक देत निक्की तांबोळी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
निक्की तांबोळीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून छोट्या पडद्यापर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासह निक्की सोशल मीडियावरही चर्चेत असते. निक्की 'बिग बॉस 14' मध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासूनच तीच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली. निक्कीने टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये जास्त काम केले नाही. परंतु ती तिच्या नवीन लूकमुळे सोशल मीडियावर रोजच चर्चेत असते.
महत्वाच्या बातम्या