Samrenu : भाजप नेत्या पंकजा मुंडेच्या हस्ते 'समरेणू'चे पोस्टर लॉंच, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Samrenu : 'समरेणू' हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Samrenu : 'समरेणू' (Samrenu) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते या सिनेमाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. 'समरेणू' हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'समरेणू' सिनेमात महेश डोंगरे, रुचिता मांगडेंच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. 'सुरुवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय' अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत आहेत.
View this post on Instagram
महेश डोंगरेने 'समरेणू' सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची धुरा सांभाळली आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या सिनेमातील गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे.
संबंधित बातम्या
Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती
Dementia : बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांना 'स्मृतिभ्रंश'; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
