Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'चे नवे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 2'चे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, भूल भुलैया सिनेमा 20 मे ला नक्की पाहा. कार्तिकच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करत आहेत. नव्या पोस्टरमध्ये चेटकीणींनी कार्तिकला वेढलेले दिसत आहे. नुकतचं कियारा आडवाणीने सिनेमातील तिचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
'भूल भुलैया 2' हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया'चा रिमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. सिनेमात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोना महामारीमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 22 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या