Neha Sharma Birthday: सुंदर अभिनेत्रींच्या चौकटीत अडकली, फ्लॉप चित्रपटांची साडेसाती लागली पण तानाजीमध्ये चमकली आमदाराची पोरगी!
Neha Sharma Birthday :20 वर्षांनंतर तिला तानाजी चित्रपटामुळे आत्ता कुठे अभिनेत्री म्हणून पाहिले जाऊ लागलंय .
Neha Sharma Birthday: बॉलीवूड नव्यानं पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रींना आपल्या अचाट झगमगाटानं दीपवून टाकतं . अभिनयात चुणूक असलेले कलाकार चटकन पुढे जातात . पण अनेक जणी या चमकत्या मायाजालाच्या काचेत अडकून पडतात . 'सुंदर' , सुडौल , आकर्षक चौकटीत एकदा अभिनेत्री बसली की त्या प्रतिमेच्या ओझ्याखाली अभिनयाकडं वळणं अशक्य होऊन बसतं. बॉलिवूडमध्ये आलेल्या एका अभिनेत्रीच काहीसं असच झालंय.
2007 मध्ये तेलगू चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आली खरी. काम मिळालं पण ओळख आणि नाव कमवण्यासाठी नेहा शर्माला फार स्ट्रगल करावा लागलाय . एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट पण नंतर फ्लॉप चित्रपटांची साडेसाती माग लागली आणि ही अभिनेत्रीही सेलिब्रेटींच्या रेसमध्ये मागे पडली . तानाजी चित्रपटानं आता कुठे तिला ओळख मिळू लागली आहे.
20 वर्षांत दिसली या सिनेमात
गेल्या 20 वर्षांपासून नेहा शर्मा बॉलिवूडमध्ये काम करतेय. तिनं 11 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यात ‘क्रूक’, ‘क्या सुपरकूल है हम’, ‘यमला पगला दिवाना’, ‘तानाजी’ असे काही गाजलेले चित्रपटही आहेत . चित्रपट गाजले असले तरी स्वतःची ओळख काही नेहाला मिळाली नाही. पण 20 वर्षांनंतर तिला तानाजी चित्रपटामुळे आत्ता कुठे अभिनेत्री म्हणून पाहिले जाऊ लागलंय .
नेहा बिहारच्या आमदाराची मुलगी
बिहारच्या भागलपूरमध्ये नेहाचा जन्म झाला. तिचे वडील अजित शर्मा राजकारणात सक्रिय आहेत. बिहारच्या विधानसभेचे ते सदस्य (आमदार) आहेत. नेहा मुंबईत अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली . पण आपल्या करियरमध्ये आपण कायम एकटे असतो हे सूत्र नेहाच्या बाबतीत कसे अपवाद ठरेल ?
सिनेमा तर हीट पण नेहा कुठेच नाही!
'सुंदर मुलगी'च्या टाइपकास्टपासून फारकत घेणे खूप कठीण असल्याचं नेहा सांगते .. मला अशा भूमिका देण्यात यायच्या ज्यात फक्त डान्स असतो आणि बाकी काहीच नसतं . त्यामुळे नेहाचे चित्रपट तर हीट ठरले पण त्यात नेहा फारशी कुठे दिसलीच नाही. नेहा सांगते,मी अशा काळातून गेले आहे जेव्हा माझे रोल कापले गेले. माझी मोठी भूमिका असली तरी मी पुरस्कार सोहळ्या चा भाग नसायचे .