Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या मुलांच्या कस्टडीबाबत आलिया सिद्दीकीच्या वकिलांचा दावा; म्हणाले, "तो केवळ प्रोव्हायडर आहे म्हणून..."
नवाजुद्दीनची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या मुलांच्या कस्टडीबद्दल दावा केला.
Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या दुबईमधील हेल्परचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची हेल्पर सपना ही भावूक झालेली दिसत होती. सपनाचा हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी शेअर केला. त्यानंतर बोलताना नवाजुद्दीननं त्याची मुलं शोरा आणि यानी यांच्या शिक्षणाबाबतही चिंता व्यक्त केली आहे. मुलांनी दुबईला शिक्षणासाठी परत जावे अशी माझी इच्छा असल्याचं वक्तव्य नवाजनं केलं आहे.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या मुलांच्या कस्टडीबद्दल दावा केला. वकिलांनी सांगितले की, "मुलांच्या कस्टडीसह सर्व बाबींवर न्यायालय निर्णय घेईल. या दरम्यान मुले भारतात त्यांचे शिक्षण सुरू ठेवू शकतात. नवाजुद्दीनला केवळ तो प्रोव्हायडर आहे, या आधारावर मुलांची पूर्ण कस्टडी मिळू शकत नाही."
नवाजुद्दीनच्या घरातील हेल्पर सपनाची कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिझवान सिद्दीकी यांनी नेटकऱ्यांसमोर मांडली. तेव्हापासून रिझवान हे सपनाबद्दल नियमित अपडेट्स शेअर करत आहेत. एकावृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, रिझवानने सांगितलं आहे की, नवाजची पत्नी आलिया सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. आलिया सिद्दीकीनं फैमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करुन आपल्या मुलांच्या फॅटरनिटी टेस्टची मागणी केली आहे. तसेच ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
रिझवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनची हेल्पर सपनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सपना म्हणाते, 'मी सपना बोलत आहे. मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे. मॅडम गेल्यावर सरांनी मला व्हिसा दिला होता. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.'
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीन हा लवकरच 'हड्डी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :