एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#MeToo च्या जाळ्यात अडकला नवाजुद्दीन, माजी मिस इंडियाचा आरोप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता 'मीटू'च्या जाळ्यात अडकला आहे. माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंह हिने आता नवाजवर आरोप केले आहेत.
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता मीटूच्या जाळ्यात अडकला आहे. माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंह हिने आता नवाजवर आरोप केले आहेत. पत्रकार संध्या मेनन हिने ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे खूप ट्विट्स करत निहारिकाची करुण कथा जगासमोर मांडली आहे. त्याचवेळी तिने नवाजवर खूप मोठमोठे आरोप केले आहेत.
निहारिका आणि नवाज ‘मिस लवली' या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. निहारिकाने म्हटले आहे की, ‘’एके दिवशी माझ्या घराजवळच नवाजुद्दीन सिद्दिकीच्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. त्याचे शुटिंग रात्रभर चालले. मी नवाजला सकाळी माझ्या घरी नाश्त्यासाठी बोलावले होते. नवाज सकाळी घरी आला, मी दरवाजा उघडल्यावर नवाजने मला मिठित घट्ट पकडले. मी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सुरुवातीला मला ते शक्य झाले नाही. त्यानंतर काही वेळ आमच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर मी त्याच्या मिठीतून सुटले. मला कळत नव्हते आमच्या नात्याचे काय करावे. नवाज मला म्हणाला की माझे स्वप्न आहे की, परेश रावल आणि मनोज वाजपेयी यांच्याप्रमाणे माझी बायकोसुद्धा मिस इंडिया किंवा मोठी बॉलिवूड अभिनेत्री असावी’’.
त्यानंतर निहारिकाने सांगितले की, मला काही दिवसांनी समजले की, ‘’नवाज अनेक मुलींशी रिलेशनशिप्समध्ये आहे. तो प्रत्येक मुलीला वेगवेगळी गोष्ट सांगून फसवतो. त्यानंतर मला एकापाठोपाठ एक अशी नवाजची वेगवेगळी रूपं समोर येऊ लागली. त्यानंतर मी नवाजसोबतचे माझे सर्व संबंध तोडून टाकले’’. निहारिकाने २००५ साली मिस इंडिया होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर तिचे बॉलिवूडमधील करिअर सुरु झाले. त्यादरम्यान तिला अनेकदा विविध आव्हानांना सामोरे जावे लागले. या सर्व गोष्टींचा खुलासा निहारिका हिने केला आहे. त्यामध्ये तिने केवळ नवाजच नाही तर निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक साजिद खान आणि जुलै महिन्यात आत्महत्या करणाऱ्या हवाई सुंदरी अनिसिया बत्रा हिचा नवरा मयांक सिंघवी याच्यावरदेखील आरोप केले आहेत.2005 Miss India Niharika Singh's experiences in Bollywood but especially with Nawazuddin Siddiqui and Mayank Singh Singvi
Niharika and other women accused Siddiqui of making up lies in his autobiography, due to which he withdrew the book. This is her side of the story. pic.twitter.com/XBVGgE3r0c — Sandhya Menon (@TheRestlessQuil) November 9, 2018
— Sandhya Menon (@TheRestlessQuil) November 9, 2018
— Sandhya Menon (@TheRestlessQuil) November 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement