Nancy Tyagi Latest News : 'कान्स'मध्ये छाप सोडणाऱ्या नॅन्सी त्यागीची फॅन झाली बॉलिवूड अभिनेत्री, दिली 'ही' ऑफर
Sonam Kapoor Praised Nancy Tyagi: कान्सच्या रेड कार्पेट नॅन्सीने स्वत: डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. नॅन्सीच्या या ड्रेसचे खूपच कौतुक झाले. आता, बॉलिवूड स्टारही नॅन्सीचे कौतुक करत आहे
Nancy Tyagi: कान्स फेस्टिवलमध्ये स्टेच्ड आउटफिटसह डेब्यू करणारी फॅशन इन्फ्लुएन्सर नॅन्सी त्यागी (Nancy Tyagi) सध्या चर्चेत आहे. नॅन्सीच्या ड्रेस डिझाइन आणि तिच्या गुणवत्तेचे कौतुक करण्यात येत आहे. कान्सच्या रेड कार्पेट नॅन्सीने स्वत: डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. नॅन्सीच्या या ड्रेसचे खूपच कौतुक झाले. आता, बॉलिवूड स्टारही नॅन्सीचे कौतुक करत आहे. अभिनेत्री सोनम कपूरने तर नॅन्सीला ऑफर केली आहे.
'कान्स'च्या पहिल्या दिवशी नॅन्सी त्यागीने गुलाबी रंगाचा सेल्फ-मेड गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी तिने लॅव्हेंडर कलरच्या डिझायनर साडीने पुन्हा एकदा आपली छाप सोडली. ही साडीदेखील नॅन्सीने स्वत: तयार केली होती. याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. आता सोनम कपूरनेही (Sonam Kapoor) हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.
View this post on Instagram
सोनम कपूरने नॅन्सीला दिली ऑफर
नॅन्सीचा व्हिडीओ शेअर करताना सोनम कपूरने कान्समधील सगळ्यात बेस्ट आउटफिट असे कॅप्शन दिले. नॅन्सी त्यागी माझ्यासाठीदेखील काही खास आउटफिट तयार कर असेही सोनमने म्हटले. नॅन्सीनेदेखील सोनमची ही स्टोरी आपल्या इन्स्टा अकाउंटवर रिशेअर केली.
सोनमसाठी ड्रेस तयार करणार नॅन्सी?
नॅन्सीने सोनमची स्टोरी रिशेअर करत म्हटले की, धन्यवाद सोनम कपूर मॅम... तुमच्यासाठी एक दिवस काही खास डिझाइन करायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा मालवीय, टीना दत्ता आणि डॉली सिंह सारख्या अभिनेत्रींनीदेखील कौतुक केले आहे.
नॅन्सी त्यागी कोण आहे?
View this post on Instagram
मूळची उत्तर प्रदेशमधील एका लहानशा गावातील असणारी नॅन्सीने 12 वीनंतर युपीएससीच्या तयारीसाठी आईसोबत दिल्ली गाठली. मात्र, कोरोना महासाथीच्या काळात तिचे शिक्षण थांबले आणि घरी आर्थिक अडचणीदेखील सुरू झाल्या. त्यानंतर नॅन्सीने कमाईसाठी सोशल मीडियाची मदत घेतली. नॅन्सी ही स्क्रॅचपासून डिझाईनर ड्रेस तयार करते आणि या ड्रेसचे मेकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.