एक्स्प्लोर
कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये : नागराज मंजुळे
पुणे: मला मराठी चित्रपट सृष्टीचा केंद्रबिंदू बनायचं नाही, असं चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलंय.
पुणे महापलिकेतर्फे दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यंदा नागराज मंजुळेंना देण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
यावेळी नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाबाबतचे अनुभव सांगितले.
"समाजाला 'सैराट' समजलाच नाही. मी जात लपवून ठेवली नाही, त्याचबरोबर स्वतःची खोटी माहिती सांगितली नाही. मात्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाज सुधारणेची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजही जातीची कवाडं करकचून बांधून ठेवली आहेत. पण जग इतकं मोठं आहे, तर मी दलित असण्याची खंत का बाळगावी. कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये", असं नागराज मंजुळे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement