एक्स्प्लोर
नागराज मंजुळेंच्या 'नाळ' सिनेमाचा ट्रेलर लाँच
झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' निर्मिती संस्थेचा 'नाळ' हा सिनेमा 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं अभिनयातील पदार्पण असलेल्या 'नाळ' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. चिमुरड्या चैत्याच्या भावविश्वातून हा सिनेमा उलगडणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' निर्मिती संस्थेचा 'नाळ' हा सिनेमा 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात नागराज मंजुळे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदारही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी छायाचित्रण-दिग्दर्शनासोबत कथा-पटकथेची जबाबदारी उचलली आहे. तर संवाद नागराज मंजुळेंच्या लेखणीतून उतरले आहेत. त्यामुळे पिस्तुल्या, फँड्री, सैराटनंतर नागराज काय कमाल करणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेऊन 'झुंड' चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. यापूर्वी त्यांच्या सर्वच चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाहा व्हिडिओ :
नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेऊन 'झुंड' चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. यापूर्वी त्यांच्या सर्वच चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाहा व्हिडिओ : आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























