एक्स्प्लोर

मी पण एका मुलीचा बाप, बंगळुरुच्या घटनेने माझं रक्त खवळलं : अक्षय

बंगळुरु : आयटी हब बंगळुरुमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंग झाला. त्यानंतर एका तरुणीची भर रस्त्यात छेडछाड झाली. या प्रकारांमुळे देशाची मान शरमेने झुकली आहे. बॉलिवूडनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर आमीर खाननेही या प्रकारावर नाराजी व्यक्ती केली आहे. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन संबंधित प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. "या घटनेबाबत कळताच माझं रक्त खवळलं. आज माणूस असल्याची लाज वाटतेय," असं अक्षय कुमार म्हणाला. अक्षय कुमार म्हणाला की, "आज मला माणूस असल्याची लाज वाटतेय. कुटुंबासोबत छोटी सुट्टी एन्जॉय करुन केपटाऊनहून परतलोय. तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलीला कुशीत घेऊन एअरपोर्टवरुन बाहेरच पडत होतो, तोपर्यंत टीव्हीवरील एका बातमीवर नजर गेली. बंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये नंगा नाच पाहिला, भर रस्त्यात... ते पाहून तुम्हाला कसं वाटलं हे माहित नाही, पण माझं रक्त खवळलं. एका मुलीचा बाप आहे. जरी नसतो तरी हेच बोललो असतो की, जो समाज आपल्या महिलांना आदर देऊ शकत नाही त्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही." मुलींचे कपडे आणि रात्री बाहेर फिरणं हे छेडछाडीसारख्या घटनेसाठी जबाबदार असल्याचं म्हणणाऱ्यांवर अक्षयने निशाणा साधला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, "सर्वाधिक शरमेची बाब म्हणजे काही जण रस्त्यावर चालणाऱ्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीचंही समर्थन करण्याची औकात ठेवतात. मुलीने तोकडे कपडे का घातले? मुलगी घराबाहेर का पडली? अरे लाज बाळगा...मुलीचे कपडे छोटे नाही, तुमचे विचार आहेत. देव ना करो, जे बंगळुरुमध्ये झालं ते कधी तुमच्या मुलीसोबत किंवा बहिणीसोबत होवो. हे लोक इतर कुठून आलेले नाहीत. ते नराधम आपल्यामध्येच आहेत. ज्या दिवशी या देशाची मुलगी पलटवार करेल ना, त्यावेळी तुमची अक्कल ठिकाणावर येईल." याशिवाय अक्षय कुमारने मुलींना मार्शल आर्ट शिकण्याचा सल्ला दिला आहे. अक्षय म्हणतो की, "तुम्ही स्वत:ला दुबळं समजू नका. तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही पूर्णत: सक्षम बनू शकता. मार्शल आर्टमध्ये एक लहान आणि सोपी टेक्निक आहे, ज्यामुळे तुमची सुरक्षा होऊ शकते. तुमच्या मर्जीविरोधात तुम्हाला हात लावण्याची हिम्मत कोणाच्याही बापामध्ये नाही. तुम्ही घाबरु नका, तुम्ही कोणापेक्षाही मागे नाही. अलर्ट राहा, स्वरक्षण शिका, पुढील वेळेला जर कोणीही तुम्हाला कपड्यांवर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्पष्ट सांगा की, तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव, थँक्यू, जयहिंद!" पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Embed widget