VIDEO : दिवाळी पार्टीत कडेकोट बंदोबस्तात पोहोचला बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी, बिश्नोईच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ
Celebrity Diwali Party : सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्ट्या सुरु आहेत. यामध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
Munawar Faruqui Entry with Police Security : बिग बॉस 17 सीझनचा विजेता स्टँडअप कॉमेडीयन आणि यूट्यूबर मुनव्वर फारुकी याने नुकतीच दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळी तो मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोहोचला होता. मुनव्वर फारुखी नुकताच मुंबईतील दिवाळी पार्टीत पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. तो बाऊंसर आणि पोलिसांसोबत असल्याचं दिसला. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे मुनव्वरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
धमकीनंतर दिवाळी पार्टीत कडेकोट बंदोबस्तात पोहोचला मुनव्वर
मुनव्वर फारुकीला बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या मृत्यूच्या धमक्यांदरम्यान मुनव्वर फारुकी उच्च पोलीस सुरक्षेसह दिसला. मंगळवारी धनत्रयोदशीच्या निमित्ताने सेलिब्रिटींसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये मुनव्वर फारुखी त्याच्या स्टाईलमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड आणि पोलिस होते. या दिवाळी पार्टीमध्ये मुनव्वरसह इतरही अनेक सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळाली.
बिश्नोई गँगच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ
View this post on Instagram
कडेकोट बंदोबस्तात दिसला मुनव्वर फारुकी
प्रसिद्ध यूट्यूबर (YouTuber) आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी देखील या दिवाळी पार्टीत दिसला. कडेकोट बंदोबस्तात तो दिवाळी पार्टीत पोहोचला होता. यावेळी त्याने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. दिवाळी पार्टीमध्ये मुनव्वर फारुकी काळ्या रंगाच्या शेरवाणीमध्ये दिसला. ही दिवाळी पार्टी प्ले डीएमएफ (Play DMF) आणि विकीर फिल्म्स (Vikir Films) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वरही बिष्णोई गँगच्या रडावर?
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतनंतर एकीकड सलमान खानला धमक्या मिळत असताना स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्यानंतर मुनव्वर फारुकीलाही बिश्नोई टोळीने धमकी दिली. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :