Ranveer Singh Police Complaint : न्यूड फोटोसेशन रणवीरला महागात पडणार? सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Ranveer Singh Police Complaint : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या चर्चेत आहे. त्याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच अभिनेता रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
न्यूड फोटोसेशन करणारा अभिनेता रणवीर सिंहविरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या न्यूड फोटोसेशनविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये काय आहे?
रणवीर सिंहने त्याचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पेपर मॅक्झिनसाठी त्याने हे फोटोशूट केलं आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हे फोटोशूट केलं आहे. रणवीर समाज बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या कृत्यामुळे महिलांना लज्जास्पद वाटत आहे. त्यामुळे रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याने तसेच महिलांच्या भावना दुखावल्याने एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अभिनेता रणवीर सिंहने एका मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देताना दिसला. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. हे फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या